Gujarat Titans l IPL प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. IPL मधील आघाडीची टीम म्हणजेच गुजरात टायटन्स आता मुख्य प्रशिक्षक बदलण्याच्या तयारीत आहे. कारण आशिष नेहरा यांचा कार्यकाळ संपणार आहे. आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्स आयपीएल 2022 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर आयपीएल 2023 मध्ये देखील गुजरात टायटन्स उपविजेता संघ ठरला आहे. मात्र यंदाच्या मोसमात आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स हा संघ आठव्या स्थानावर राहिला आहे. एकंदरीत आशिष नेहरा हे मुख्य प्रशिक्षक म्हणून यशस्वी झाले असले तरी त्यांचा कार्यकाळ वाढणार नसल्याचे मानले जात आहे.
युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक बनणार? :
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आशिष नेहराच्या जागी आता दिग्गज खेळाडू युवराज सिंगला मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. कारण यामागे ३ मोठी करणे आहेत, ज्यामुळे युवराज सिंगचा दावा खूप मजबूत मानला जात आहे.
युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांचे नाते खूपच घट्ट आहे. दोघेही खूप दिवसांपासून चांगले मित्र आहेत. तसेच युवराज सिंग आणि आशिष नेहरा भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळले आहेत. मात्र, गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा हा मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाला तर युवराज सिंगला मुख्य प्रशिक्षक बनवले जाण्याची शक्यता आहे.
Gujarat Titans l युवराज सिंग पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार :
युवराज सिंगने 2019 मध्ये क्रिकेटला अलविदा केल आहे. पण त्याआधी त्याने आयपीएलचे १३२ सामने खेळले आहेत. आयपीएल सुरू झाले तेव्हा युवराज सिंग पंजाब किंग्जचा कर्णधार होता. त्यामुळे दिग्गज खेळाडू युवराज सिंगची नेतृत्व गुणवत्ता अतिशय चांगली असल्याचे देखील मानले जात आहे. याशिवाय युवराज सिंग हा मार्गदर्शकाची भूमिका देखील चांगल्या प्रकारे निभावू शकतो.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि युवराज सिंग हे दोघेही पंजाबचे आहेत. याशिवाय युवराज सिंग शुभमन गिलला मार्गदर्शन करत आहे. दोघांमधील संबंध अतिशय चांगले आहेत. मात्र, युवराज सिंग प्रशिक्षक बनल्यास तो पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल.
News Title- Yuvraj Singh Join Gujarat Titans As Head Coach:
महत्वाच्या बातम्या-
सुप्रियाताईंना देखील लाडक्या बहिणीचे 1500 रुपये मिळणार?
‘अशा’ व्यक्तींनी चुकूनही सफरचंद खाऊ नये; अन्यथा होतील गंभीर परिणाम
“फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ”; संजय राऊतांची भविष्यवाणी
धोनीसाठी कायपण! CSK ला लवकरच मिळणार खुशखबर?
पाऊस पुन्हा परतला! आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार, यलो अलर्ट जारी