बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णांसाठी देशभरातील हॉस्पिटल्सला 1000 बेड्स देणार- युवराज सिंह

नवी दिल्ली | कोरोना विषाणूने वर्षभरापूर्वीपासून देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोनामुळे बळी जाणाऱ्या रुग्णांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. एकिकडे दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या आकड्यात भर पडत आहे. तर दुसरीकडे देशभरातील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहे. अशा परिस्थितीत देशभरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. अशातच टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह देखील या महाभयंकर संकटात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

युवराज सिंहने नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठीची घोषणा केली आहे. युवराज त्याच्या ‘यु वी कॅन’ या फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभरातील गरज असणाऱ्या रुग्णालयांमध्ये 1000 बेड्सची सुविधा देणार आहे.  ‘यु वी कॅन’ या फाऊंडेशननंं ‘वन डिजीटल एंटरटेनमेंट’च्या सहकार्याने ही योजना सुरु केली आहे.

या योजनेबद्दलची माहीती देताना ट्वीटरवर पोस्ट करत युवराज म्हणाला की, एकटा आपण एक थेंब आहोत. एकत्र आपण समुद्र आहोत. चला आपण मिळून समर्थनाचे सागर बनू जे एखाद्याच्या आयुष्यात फरक आणू शकेल. या ट्वीटसोबत युवराजने ‘Mission1000Beds’ असा हॅशटॅग देखील दिला आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या या कठिण काळात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच युवराज सिंहची ही मदत खूप मोलाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे, यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह, चिमुकलीला धमकी, पाहा व्हिडीओ

नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक

मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त

लेकरांना बंधाऱ्यात फेकून आई फरार, धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या आत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More