नवी दिल्ली | टीम इंडियाचा फायटर किंग युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने युवराजने त्याच्या चाहत्यांना आवाहन केलंय.
सध्या देशात कोरोनाचं संकट आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा बराच गाजतोय. याच पार्श्वभूमीवर युवराज सिंगने आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलंय. यासंदर्भात त्याने चाहत्यांसाठी एक पत्रही लिहिलंय.
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 11, 2020
युवराज पत्रात लिहीतो, “या वर्षी माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी लवकरात लवकर शेतकरी आणि सरकारमध्ये सुरु असलेल्या मुद्द्यावर समाधान निघावं यासाठी मी प्रार्थना करतो. देशातील शेतकरी समाजाची जीवनधारा आहेत. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असं मला वाटतं.”
पत्रात तो पुढे म्हणतो, “देशातील कोविड 19 चं संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला संपूर्ण ताकदीने लढा द्यायचाय.”
थोडक्यात बातम्या-
पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!
‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत
गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!
“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”
शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस