खेळ

या कामगिरीमुळे युवराज सिंगला कुणीही विसरू शकणार नाही…!

मुंबई |  लढवय्या खेळाडू आणि धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र त्याने खेळलेल्या अनेक खेळींमुळे भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनावर तो अधिराज्य जागवत राहिल.

त्यातीलच त्याची एक महत्वपूर्ण खेळी… सामना होता टी-ट्वेटी विश्वचषकातील भारत विरूद्ध इंग्लंड… दिवस 19 सप्टेंबर 2007… युवराज सिंगने या सामन्यात इंग्लडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सलग 6 षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. युवराजच्या या खेळीने क्रिकेटरसिकांना त्याची भुरळ पडली होती.

युवराज सिंगच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडविरूद्ध झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. 2007 च्या टी-ट्वेटी विश्वचषकात युवराज सिंहने मोलाची भूमिका बजावली होती.

2011 सालचा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात देखील युवराजने सिंहाचा वाटा उचललेला होता. या विश्वचषकात त्याने 9 सामन्यांमध्ये 362 धावा फटकावत आपल्या जादुई फिरकीने 15 फलंदाजांना  माघारी धाडलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

-यंदाच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादीने दिला ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ संदेश

-“पराभवाची चर्चा बस्स करा; आता विधानसभेच्या तयारीला लागा”

“महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची वाताहत”

-“विधानसभेला शिवसेनेबरोबर युती कायम पण मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या