Yuzvendra Chahal and Dhanashree Verma l गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या वैयक्तिक आयुष्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. युजवेंद्र चहल भारताचा फिरकी गोलंदाज आहे, तर धनश्री वर्मा नृत्यांगना आहे. दोघेही विभक्त होणार असून त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) आणि इंस्टाग्राम (Instagram) पोस्टवरून ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
लवकर लग्न आणि घटस्फोटापर्यंतचा प्रवास :
युजवेंद्र चहल आणि धनश्रीचे लग्न डिसेंबर 2020 मध्ये झाले. पहिल्या भेटीनंतर त्यांनी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला, याचा खुलासा त्यांनी एका शोमध्ये केला होता. चहल आणि धनश्रीचे लग्न पाच वर्षेही टिकले नाही आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. चहल क्रिकेटपटू आहे, तर धनश्री दंतवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेणारी, व्यवसायाने नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका आहे.
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma l लग्नानंतरचे संबंध आणि विभक्त होण्याची चर्चा :
लग्नानंतर पहिली तीन वर्षे दोघांचे संबंध चांगले होते. ते प्रत्येक कार्यक्रमात एकत्र दिसत. त्यांनी एकत्र एक शो देखील केला होता. एका डान्स शोमध्ये धनश्रीला पाठिंबा देण्यासाठी चहल तेथे गेला होता. लग्नाच्या चौथ्या वर्षी दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ते दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसणे बंद झाले. त्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली.
घटस्फोट आणि पोटगीची चर्चा :
आता अशी बातमी आहे की, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्री वर्माला 60 कोटी रुपये देणार आहे. घटस्फोटानंतर युजवेंद्रला धनश्रीला 60 कोटी रुपये द्यावे लागतील, असे बोलले जात आहे.