Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या (Dhanashree Verma) घटस्फोटाच्या अफवांमुळे (Divorce Rumors) चर्चेत आहे. मात्र, अद्याप दोघांपैकी कुणीही घटस्फोटावर अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. चहल आणि त्याच्या पत्नीमध्ये काहीतरी बिनसल्याचे बोलले जात आहे. अशातच, अनेक वर्षांपासून टीम इंडियातून (Team India) बाहेर असलेल्या युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करून सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.
चहलची इंस्टाग्राम स्टोरी
क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने देवाचे आभार मानले आहेत. सध्या चहलच्या या स्टोरीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
स्टोरीमध्ये काय लिहिले आहे?
युजवेंद्र चहलने स्टोरी शेअर करताना लिहिले आहे की, “जितक्या वेळा मी पाहू शकतो, देवा, तू नेहमीच माझे रक्षण केले आहेस. त्यामुळे मी फक्त त्या वेळेची कल्पना करू शकतो, जेव्हा तू मला वाचवलेस, ज्याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. माझ्यासोबत नेहमी राहण्यासाठी देवा, तुझे आभार, त्या वेळीही जेव्हा मला याची कल्पना नव्हती.” दरम्यान, चहल आणि धनश्री यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, घटस्फोट झाल्यास चहलला पत्नी धनश्री वर्माला तब्बल ६० कोटींची पोटगी द्यावी लागेल, असा दावा त्याच्या चाहत्यांनी केला आहे.
युजवेंद्र चहलची क्रिकेट कारकीर्द
युजवेंद्र चहलने ११ जून २०१६ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने किफायतशीर गोलंदाजी करत एक बळी घेतला. कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात त्याने २५ धावांत ३ बळी घेत चांगली कामगिरी केली, ज्यामुळे भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. गोलंदाज म्हणून त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील ७२ सामन्यांच्या ६९ डावांमध्ये २७.१३ च्या सरासरीने १२१ बळी घेतले आहेत. टी-२० बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी घेतले आहेत. एकेकाळी तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
Yuzi Chahal’s Instagram story. pic.twitter.com/mlEGpPOLLO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2025
Title : Yuzvendra Chahal Mysterious Post says Thanked God