Zaheer Iqbal Surprises | बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. नुकताच सोनाक्षीने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाह केला आहे. यामुळे सोनाक्षी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या विवाहावरून अनेक नकारात्मक चर्चा होती. शत्रुघ्न सिन्हा हे आपली मुलगी सोनाक्षीवर नाराज होते अशी चर्चा होती. (Zaheer Iqbal Surprises)
विवाहामुळे कॉन्ट्रोव्हर्सीची चर्चा
सोनाक्षी आणि झहीर इक्बालच्या विवाहाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हाचा नुकताच विवाह झाला. विवाहात शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याचं दिसत होते. यामुळे कॉन्ट्रोव्हर्सी झाली. सोनाक्षीच्या विवाहावर शत्रुघ्न सिन्हा खूश नसल्याची चर्चा आहे. मात्र त्याबाबत अद्यापही ठोस माहिती समोर आली नाही. सोनाक्षी आणि झहीरच्या विवाहाला शत्रुघ्न आणि आई पुनम सिन्हा दोघे उपस्थित होते. मात्र सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा विवाहाला उपस्थित राहिला नाही. (Zaheer Iqbal Surprises)
अशातच आता शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी- झहीर यांच्यात बिनसलं अशी चर्चा होती. मात्र आपल्या लाडक्या जावयाने शत्रुघ्न सिन्हाला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक सरप्राईज (Zaheer Iqbal Surprises) दिलं आहे. यावरून शत्रुघ्न सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल यांच्यातील नातं हे सध्या चांगलं असल्याचं समोर आलं आहे. कारण झहीर आणि सोनाक्षीच्या घरी शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदीवस साजरा करण्यात आला.
View this post on Instagram
सोनाक्षीचे बाबा शत्रुघ्न आणि आई पुनम सिन्हा यांचा नुकताच 44 वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी त्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुलगा लव आणि सोनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच वाढदिवशी झहीर इक्बालने आपल्या सासरे आणि सासूच्या लग्नाच्या वाढदिवशी मोठं सरप्राईज (Zaheer Iqbal Surprises) दिलं आहे.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या जावयाचं सासऱ्याला सरप्राईज
झहीर इक्बालने शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या 44 व्या लग्नाचा वाढदिवस हा त्यांच्याच घरी साजरा केला. यामुळे पूनम सिन्हा आणि शत्रूघ्न सिन्हा हे एकमद खूश असल्याचं दिसून आलं आहे. सोनाक्षीला आपल्या आई-बाबांची आठवण येत होती. यामुळे झहीर इक्बालने शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचा आपल्याच घरी लग्नाचा वाढदिवस साजरा करून सरप्राईज दिलं आहे.
हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मातील संस्कृती सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालमुळे एकत्र आल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा या विवाहास विरोध होता, अशा अनेक बातम्या आणि सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. तसेच सोनाक्षीचा भाऊ देखील लग्नासाठी न आल्याने चर्चांना तर्कवितर्क लावले जात आहेत.
News Title – Zaheer Iqbal Surprises To Shatrughna Sinha On His Marriage Anniversary
महत्त्वाच्या बातम्या
पावसाळ्यात रम प्यावी की ब्रँडी?, आरोग्यासाठी हे खरंच चांगलं आहे का?
“हिंदूंनो धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा, नाहीतर…”; केतकी चितळेची पोस्ट प्रचंड चर्चेत
“लग्न होईपर्यंत आपण सेक्स करायचं…”; ‘हिरामंडी’ फेम ‘या’ अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
“मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ मग आम्ही कोण?”; तृतीयपंथीयांचा सवाल
राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर