मुंबई | तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही, असं म्हणत महिला कुस्तीपटू बबिता फोगटने ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं.
एका व्हिडीओच्या माध्यमातून बबिताने मी कोणालाही घाबरत नसल्याचं म्हटलं होतं. हे सांगत असताना बबिताने अभिनेत्री झायरा वसीमच्या नावाचा उल्लेख केला होता. यावरून झायरा वसीमने अप्रत्यक्षरित्या बबिता फोगटला टोला लगावला आहे.
अहंकाराने तुमच्यातील अज्ञानता वाढवू नका. आपण जेव्हा सत्याचा शोध घेतो तेव्हा तो नम्रेतेनं घ्यायला हव, असं ट्विट झायराने केलं आहे. या ट्विटमध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र तिने बबिता फोगटलाच अप्रत्यक्षरित्या टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, बबिता फोगटने एक ट्विट करत तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. कोरोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या असून पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात आहे, असं तिने म्हटलं होतं. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या ट्रोल करण्यात आलं.
Don’t let your ignorance be strengthened by your arrogance. When you seek the truth, seek it with humility.
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) April 18, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘संतांची, वीरांची भूमी नाही तर …’; पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला
पालघरमध्ये नेमकं काय घडलं?; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
महत्वाच्या बातम्या-
पालघर घटनेनंतर उद्धव ठाकरेंना अमित शहांचा फोन; म्हणाले…
पालघर हत्या प्रकरणी योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन
पालघर झुंडीकडून हत्या; योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन
Comments are closed.