झेलेन्स्कींना सतावतेय ‘ही’ भीती, अधिकाऱ्यांना दिले काहीही न खाण्या पिण्याचे आदेश
कीव | रशिया-युक्रेन युद्धाला सुरूवात होऊन आता एक महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. रशियाकडून (Russia) सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह झाली आहे. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
युक्रेनच्या शिष्टमंडळाने रशियासोबतच्या चर्चेदरम्यान काहीही खाऊ पिऊ नये, असे आदेश झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी दिले आहेत. झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात या चर्चेदरम्यान काहीही न खाण्या पिण्याचे तसेच कोणत्याही गोष्टीला स्पर्श न करण्याचे आदेश दिले आहेत.
चर्चेच्या मागच्या फेरीनंतर युक्रेनच्या काही अधिकाऱ्यांच्या तब्येतीत बिघाड झाली होती. यानंतर झेलेन्स्की यांना रशियाकडून रासायनिक हल्ल्याची भीती सतावत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना काहीही न खाण्या-पिण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, युक्रेनच्या कीव आणि चेर्निहीव या दोन शहरांमधील सैन्य संख्या कमी करण्याचं आश्वासन रशियाने चर्चेदरम्यान दिलं होतं. मात्र, या दोन शहरात अजूनही युक्रेनियन सैनिक रशियन सैन्यांशी लढा देत असल्याने झेलेन्स्की यांनी रशियाच्या आश्वासनावरून संशय व्यक्त केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“एकनाथ शिंदे हुशार व्यक्ती, त्यांनाच मुख्यमंत्री करा”
आधार, पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा होईल मोठं नुकसान
“संजय राऊतांनी कायमचं मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल”
झेलेन्सकी यांचा रशियाला गंभीर इशारा, म्हणाले…
दमदार फिचर्ससह Kiger कॉम्पॅक्ट SUV भारतात लाॅन्च; किंमत पण फारच कमी…
Comments are closed.