बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झेलेन्सकी यांचा रशियाला गंभीर इशारा, म्हणाले…

कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाकडून (Russia) होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं (Ukraine) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युद्ध संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत. तर इस्तंबूल येथे झालेल्या चर्चेत रशियाने कीव आणि चेर्निहीव शहरातील सैन्य कमी करण्याचे आश्वासन दिले होते.

रशियाने युक्रेनमधील या दोन शहरातील सैन्य संख्या कमी करण्याचे आश्वासन दिले असले तरी युक्रेनने याबद्दल शंका उपस्थित केली आहे. जमिनीवर युक्रेनियन सैन्य अजूनही कीव आणि चेर्निहीव शहरात रशियन सैन्याशी लढत आहे. रशियाने आश्वासन देऊनही हल्ले कमी होत नाहीत. हे बोलताना युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr zelensky) यांनी रशियाला इशारा दिला आहे.

युक्रेनियन लोकांना नवशिक्या समजू नका, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे. हल्ल्यानंतरच्या 34 दिवसांत आणि गेल्या आठ वर्षांच्या डॉनबास युद्धात आम्ही शिकलो आहोत की विश्वास ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे ठोस परिणाम, असं वक्तव्य झेलेन्स्की यांनी केलं आहे.

दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेन राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की लवकरच तुर्कीस्तानात भेटू शकतात, अशी माहिती रशियन शिष्टमंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दमदार फिचर्ससह Kiger कॉम्पॅक्ट SUV भारतात लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट; ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

आघाडीत बिघाडी???, आमदारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

“जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी… तेणे पत्थ्य सांभाळावी”, मोदींना खोचक टोला

“गली गली में शोर है, भाजपवाले चोर है”, दरेकरांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More