पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचं ‘झंडू बाम वाटप’ आंदोलन

उस्मानाबाद | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मोफत ‘झंडू बाम वाटप’ आंदोलन सुरु केलं आहे. वाशीतील पारगावमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या नागरिकांना झंडू बामचं वाटप करण्यात आलं.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरिकांचा मनस्ताप आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हे आंदोलन हाती घेण्यात आलं आहे. पेट्रोल पंपावर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल भरुन झाल्यानंतर झंडू बामची बाटली देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

-जिओ फोन 2 बाजारात; एवढी कमी किंमत एेकून थक्क व्हाल!

-…अखेर राम कदम नमले; ट्विटरवरून मागितली माफी

-…अखेर महिला आयोगाला जाग; राम कदमांना पाठवली नोटीस

-…तर संतापाचा भडका उडेल; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा

-राम कदमांविरोधात गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करू; काँग्रेस-राष्ट्रवादीचा इशारा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या