काळजी घ्या! पुण्यातील ‘या’ परिसरात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण

पुणे। दोन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगभरात चांगलंच थैमान घातलं होतं. कोरोना आटोक्यात येत नाही तोवर राज्यात पुन्हा एका नव्या विषाणूने तोंड वर काढलं. झिका असं या नव्या विषाणूचं नाव आहे.

झिका या विषाणूचा रुग्ण पुणे येथे आढळून आला आहे. पुणे येथील बावधन इथे राहणाऱ्या झिका बाधित विषाणूचा संसर्ग झाल्याने त्याच्यावर उपचार चालू आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार हा रुग्ण मूळचा नाशिकचा असून दोन महिन्यांपूर्वी तो सुरतला गेल्याचं समजलं. त्यानंतर तो महाराष्ट्र येथे परतल्यानंतर त्याला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा येण्यास सुरवात झाली.

मागच्या महिन्यात त्यांनी पुण्यामध्ये जहांगीर रुग्णालयात उपचार घेण्याकरता गेला होता. यानंतर खासगी प्रयोगशाळेत या रुग्णाचे नुमने पाठवण्यात आले. यावेळी तो झिका बाधित असल्याचं समोर आलं.

त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील एनआयव्हीकडे त्याचे नमुने तपासायला पाठवण्यात आले. या तपासानंतर तो झिका बाधीत असल्याचं निश्चीत झालं. झिकाचा रुग्ण आढळल्याने पुण्यात महानगरपालीकाची यंत्रणा सर्तक झाली.

झिका बाधित असलेल्या रुग्णाच्या परिसरातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. आणि त्यात एकही संशियत रुग्ण आढळला नाही. मात्र त्यानंतर बावधान येथील परीसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण, कंटेनर सर्वे करण्यात आले परंतु कुठेही या विषाणूचे डास आढळले नाहीत.

कधी कधी झिकाचे लक्षण लवकर आढळून येत आहेत. मात्र जर तुम्हाला ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या होत असल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखवावं.

थोडक्यात बातम्या-

WhatsApp च्या नवीन फीचरमुळं जुनी चॅटिंग शोधणं झालं आणखी सोपं

मोठी बातमी! अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या जाळ्यात

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर!

“संजय राऊत यांना पिसाळलेलं कुत्रं चावलंय”