बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?, पुण्यातील ‘इतक्या’ गावांना संभाव्य धोक्याचा इशारा

पुणे | गेल्या 4 महिन्यांपुर्वी कोरोनाने पुण्यात थैमान घातलं होतं. त्यामुळे पुण्यात लसीकरण प्रकिया मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. त्यानंतर कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. पण जगात हैदोस घालणाऱ्या झिका व्हायरसने पुण्यात प्रवेश केला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. पुण्यातील एका वृद्ध महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं काही दिवसापुर्वी समोर आलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील काही गावांना संभाव्य धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यातील एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली. त्यानंतर आता पुणे जिल्हयातील 79 गावं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील या 79 गावांना झिका व्हायरसचा संभाव्य धोका असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या संभाव्य धोक्यामुळे या गावांंमध्ये तातडीच्या उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत.

जुन्नर तालुक्यातील 6 गावांचा समावेश या संवेदनशील गावांमध्ये करण्यात आला आहे. तर, खेडमधील 10 गावं यात आहेत. हवेली तालुक्यातील तब्बल 19 गावांचा समावेश संवेदनशील गावांच्या यादीत करण्यात आला आहे. तर, बारामती तालुक्यातील 12 गावांचा समावेश करण्यात आला आहे. असे एकूण 11 तालुक्यातील 79 गावांचा समावेश यात आहे.

दरम्यान, झिका हा डेंग्यु आणि चिकनगुनिया सारखा रोग आहे. त्यामुळे मागील 3 वर्षात डेंग्यु आणि चिकनगुनिया जास्त असलेल्या गावांच्या आकडेवारीवरून ही यादी तयार करण्यात आली आहे. डेंग्यु आणि चिकनगुनिया सारखी लक्षणं आढळल्यास रूग्णाच्या रक्ताची चाचणी केली जाणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आनंदाची बातमी! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

पाकिस्तानच्या अर्शदला पदक मिळालं असतं तर मलाही आनंद झाला असता- नीरज चोप्रा

‘पंतप्रधान मोदींनी माझ्या लोकप्रियतेमुळेच टिकटाॅकवर बंदी आणली’

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More