पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. सर्व काही सुरळीत होत असताना आता पुण्यात आणखी एका व्हायरसने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात झिका व्हायरसचा शिरकाव झाल्यानं आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुण्यातील एका महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका व्हायरसचा पहिला रूग्ण आढळला होता. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. आरोग्य यंत्रणेने बेलसरसह अन्य 5 गावात सर्वेक्षण सुरू केलं. त्यावेळी केंद्रीय यंत्रणा देखील देशात झिका व्हायरस पसरत असलेल्या शहरांवर नजर ठेऊन होती. आता पुण्यात रूग्ण सापडल्यानं केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालंय.
मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं. हे पथक आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर बेलसर गावात जाण्याबाबत निर्णय घेणार आहे. आज दिवसभर हे पथक अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहे. या पथकात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि काही आरोग्य अधिकारी आहेत.
दरम्यान, झिकाचे पहिलं लक्षण म्हणजे ताप येणं, अंगदुखणं, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणं तसेच या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरसचे प्रमुख लक्षण असल्याची माहिती समोर आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!
भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
‘एक चांगला कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे’, अक्षय कुमारच्या पोस्टनंतर चाहते भावूक
Comments are closed.