‘एक तरी विद्यार्थी असा दाखवा ज्याला…’; जिल्हा परिषद शाळेच्या चॅलेंजची महाराष्ट्रभर चर्चा

SCERT Maharashtra

Zilla Parishad School Challenge | जिल्हा परिषद शाळेत ( Zilla Parishad School Challenge) गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, असा आरोप करत अनेक पालक खासगी शाळांकडे (Private School) वळत आहेत. त्यामुळे सरकारी शाळांची पटसंख्या घटत आहे. अशा परिस्थितीत, बेवनाळ शाळेने (Bevinhal School) जिल्हा परिषद शाळा गुणात्मक असल्याचे दाखवून दिले आहे. “आमच्या शाळेत लिहिता, वाचता आणि आकडेमोड न येणारा विद्यार्थी दाखवा आणि रोख एक लाख रुपये मिळवा,” असं आव्हानच या शाळेनं दिलं आहे. या अनोख्या आव्हानामुळे शाळेची फक्त तालुक्यातच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

उपक्रमांमुळे विद्यार्थी हुशार

शिरूर अनंतपाळ (Shirur Anantpal) तालुक्यातील बेवनाळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. केवळ दोन शिक्षक असलेल्या या शाळेत २४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी येथील शिक्षक नेहमीच विविध उपक्रम राबवतात.

केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० (New Education Policy 2020) अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केंद्रप्रमुख प्रभाकर हिप्परगे (Prabhakar Hipparge) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

‘ओपन चॅलेंज’मुळे (Open Challenge) चर्चा

प्राथमिक शिक्षणातच प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन, लेखन आणि संख्याज्ञान येणे महत्त्वाचे असल्याने, या शाळेने त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम म्हणून, कांबळगा केंद्रातील ( Kambalga Kendra) बेवनाळ शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वाचन, लेखन आणि संख्याज्ञानामध्ये पारंगत झाला आहे. त्यामुळे या शाळेने थेट शाळेच्या गेटवर (Gate) एक फलक लावून ‘लिहिता-वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि एक लाख मिळवा,’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.

विविध उपक्रमांमुळे यश

बेवनाळ शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला लेखन, वाचन करता यावे, यासाठी तेथील शिक्षकांनी विविध उपक्रम राबवले. गणितीय आकडेमोड करण्याची कलाही विद्यार्थ्यांना शिकवली आहे. त्यामुळे अवघड गणिते मुले क्षणार्धात सोडवतात. याचमुळे शाळेने प्रवेशद्वारावर (Entrance) ‘वाचन, लेखन आणि संख्याज्ञान न येणारा विद्यार्थी दाखवा आणि लाख रुपये मिळवा,’ असा फलक लावला आहे. ( Zilla Parishad School Challenge)

Title : Zilla Parishad School Unique Challenge 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .