बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

नवी दिल्ली | काल झालेल्या T-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताचा दारूण पराभव झालेला आहे. पाकिस्तानने भारतीय संघाच्या विरोधात 10 विकेट्स राखून सामना जिंकला. भारत पाकिस्तान सामना हा दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमीसाठी नेहमीच प्रतिष्ठेचा प्रश्न राहिलेला आहे. त्यामुळे काल दोन्ही देशाच्या चाहत्यांमध्ये एक प्रकारे शीतयुद्धच रंगलेलं पाहायला मिळालं.

भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये तर वाद पेटले होतेच, मात्र या वादात 2 फुड डिलिव्हरी कंपन्यांनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. सामना चालू असताना झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲप करीम यांच्यात ट्विटरवरून शीतयुद्ध सुरू होतं. त्यानंतर हा सामना संपल्यानंतरही ते युद्ध तसंच सुरू राहील.

भारताने सामना गमावल्यानंतर झोमॅटोने काही भावनिक ट्विट केले होते. त्यानंतर पराभवावरून करीमने झोमॅटोला खिजवायला सुरूवात केली. त्यासाठी करीमने काही मीम ट्विट केेले होते. त्यानंतर झोमॅटोनेही शांत न बसता पाकिस्तानी संघासाठी ट्विट करत करीम कंपनीला जबरदस्त उत्तर दिलं आहे.

झोमॅटोने ट्विट करत म्हटलं आहे. “जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर विचार करा त्यांनी हेच 12 वेळा अनुभवलं आहे.” याआधी पाकिस्तानी संघाने 12 वेळा भारताकडून पराभव पत्करला आहे. त्यामुळे झोमॅटोने पाकिस्तानी संघाला हा टोला लगावला होता. एकंदरीतच मैदानावर तिकडे 2 संघामध्ये युद्ध सुरू असतानाच इकडे दोन फुड डिलिव्हरी कंपन्यांमध्येही युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.

 

 

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

“ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, समझनेवालों को इशारा काफी होता है”

“आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करायचा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More