बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलाच चपलीने मारलं! ‘या’ कारणाने महिलेच्या नाकातून येत होतं रक्त, डिलिव्हरी बॉयचा वेगळाच दावा

बंगळुरु | काही दिवसांपूर्वी एका महिलेनं झोमॅटो अ‌‌ॅपवरून जेवण मागवलं होतं. मात्र ऑर्डर उशिरा आल्यानं तिनं मागवलेलं जेवण कॅन्सल केलं. या गोष्टीचा राग आल्यानं डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर मारलं यात महिलेच्या नाकाला जबर मार लागला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं, असा दावा करणारा व्हिडीओ त्या महिलने शेअर केला होता.

संबंधित डिलिव्हरी बॉयचं नाव कामराज आहे. मी त्या महिलेच्या घरी पोहोचून ऑर्डर दिली आणि संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता म्हणून मी पैसे घेण्याची वाट बघत होतो. ऑर्डर पोहोचवण्यास उशिर झाला होता म्हणून मी त्यांची माफी मागितली होती. ट्रॅफिक जास्त होतं आणि रस्ता खराब असल्यानं उशिर झाल्याचं सांगितलं. त्यावेळी त्या महिलेनं झोमॅटो सपोर्टशी बोलताना ऑर्डर रद्द केली. मात्र त्यांनी पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता, असं कामराज यांनी सांगतिलं. त्यानंतर मी बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्या महिलेनं शिवीगाळ केली, चप्पलनं मारहाण केली आणि  स्वत:च्या अंगठीनं नाकावर मारुन घेत जखम केली, असं- डिलिव्हरी बॉय कामराज यांनी द न्यूज मायन्यूट या पोर्टलशी बोलताना सांगितलं.

संबंधित महिलेनं झोमॅटो या अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर केले होतं. वेळेत जेवणाची ऑर्डर न आल्यानं मी झोमॅटोच्या कस्टमर केअरमध्ये फोन केला की, ऑर्डर वेळेवर न आल्यामुळे मी मागवलेल्या जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली आहे. ही माहिती झोमॅटोच्या कस्टमर केअरला देत असतानाच एक डिलिव्हरी बॉय जेवण द्यायला आला. मी ते जेवण घेण्यास नकार दिला. ऑर्डर नाकारल्यामुळे डिलीव्हरी बॉय माझ्यावर चिडला. त्यानं हुज्जत घालणं सुरु केलं. त्यानं मागवलेलं जेवण घरात घुसून ठेवून दिलं. या प्रकाराचा मी विरोध केल्यामुळे रागात येऊन डिलीव्हरी बॉयने माझ्या नाकावर मारलं. यात माझ्या नाकाला जबर मार लागला आणि नाकातून रक्त येऊ लागलं, असा दावा त्या महिलेने केला आहे.

दरम्यान, संबंधित महिलेनं डिलिव्हरी बॉयवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची बंगळुरु पोलिसांनी दखल घेतली आणि कामराज या डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. झोमॅटोनेसुद्धा या प्रकाराची दखल घेत भविष्यात असा प्रकार घडणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर मारहाण झाल्यामुळे माफी मागत महिलेच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी झोमॅटोने दाखवली आहे.

थोडक्यात बातम्या

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं

हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ

अभी तो हम जवान है!; 80 वर्षाच्या दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र अजित पवारांच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More