बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वादात सापडलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर झोमॅटोने दिलं स्पष्टीकरण

मुंबई | कोरोनामुळे सगळे लोक काही काळासाठी घरात बसून होते. या काळात ऑनलाईन खरेदी करण्यावर भर दिला जात होता. कोरोना परिस्थिती आता पुर्वपदावर येत आहे. तरीही ऑनलाईन खरेदीची क्रेझ काही गेलेली दिसत नाही. घरी बसून आपण हवं ते खाण्यासाठी मागवू शकतो. यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या अॅपचा वापर करत असतो. फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ यात अग्रेसर पहायला मिळते. अशातच सध्या ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

झोमॅटोने नुकत्याच आपल्या दोन नव्या जाहिरात काढल्या आहे. या जाहिरातीमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफचा सहभाग आहे. एकीकडे या जाहिरतीचं कौतूक होत असताना दुसरीकडे मात्र ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीमध्ये डिलिव्हरी बाॅय आपलं काम चोख काम करताना दिसत आहे. अभिनेता हृतिक रोशनने सेल्फी मागितली असतानाही डिलिव्हरी बाॅय आपल्या कामाला महत्त्व देत आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी या जाहिरातीला ट्रोल केलं आहे.

डिलिव्हरी पार्टनर एवढे कडक नियम पाळतात आणि त्यांच्याकडे 30 सेकंद एका सेल्फीसाठी वेळ नाहीये, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एकीकडे मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सला जाहिरातीसाठी साईन करून झोमॅटो प्रसिद्धीवर पाण्यासारखा पैसा खर्च करते, दुसरीकडे डिलिव्हरी बॉईजचे शोषण करते, अशीही टीका या जाहिरातीवर केली जात आहे. आता या आरोपावर झोमॅटोनं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, जाहिरात बनवण्यामागे डिलिव्हरी पार्टनर्सना हिरो बनवणं, असा आमचा उद्देश होता. तसंच आमच्यासाठी प्रत्येक ग्राहकच स्टार आहे आणि तो हृतिक रोशन किंवा कतरिना कैफपेक्षा कमी नाही, असं आम्हाला दाखवायचं होतं. तसंच या जाहिरातीत हृतिक आणि कतरिना डिलिव्हरी पार्टनरशी ज्या प्रकारे आदराने वागतात, तसं सर्वांनीच वागण्याची गरज आहे, याकडेही आम्हाला लक्ष वेधायचं होतं. लोकांनी या जाहिरातीला वेगळ्या प्रकारे घेतलं असल्याचंही झोमॅटोनं म्हटलं आहे.

पाहा जाहिरात-

 

थोडक्यात बातम्या – 

…अन् काँग्रेसच्या माजी आमदारानं एका बुक्कीत फिरता फॅन रोखला; पाहा व्हिडीओ

पुढील तीन दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

देशातील पहिलं लसवंत राज्य! ‘या’ राज्याने पुर्ण केली 100 टक्के लसीकरण मोहिम

‘8 पदरी रस्ता, 6 पदरी पुल अन् वर मेट्रो’; नितीन गडकरींचं पुण्यासाठी मोठं स्वप्न!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More