डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

मुंबई |टीकेला सामोरं जाणाऱ्या आॅनलाईन फूड आॅर्डर कंपनी झोमॅटोने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आॅर्डर करण्यात आलेल्या पदार्थांना पॅक करण्यासाठी टॅम्फर प्रूफ टेप आणण्याचा निर्णय झोमॅटोने घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी झोमॅटोचा डिलिव्हरी बाॅय आॅर्डर केलेले पदार्थ पॅकेटमधून काढून खात असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर झोमॅटोवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती.

याची गंभीर दखल झोमॅटोने घेतली असून टॅम्फर प्रूफ टेपचा पर्याय समोर आणला आहे. यामुळे आॅर्डर केलेले पदार्थ सुरक्षित राहतील असा दावा झोमॅटोने केला आहे. 

दरम्यान, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून आम्ही त्या डिलिव्हरी बाॅयला कामावरुन काढून टाकलं आहे, असं झोमॅटोच्या प्रतिनिधिंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

-राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत मांडला मुद्दा

-प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

-…म्हणून ‘हॉकी इंडिया’च्या सीईओंनी त्या खेळाडूंना चक्क हाकलून लावलं!

-महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा सरकार करणार गौरव

-काॅमेडी किंग कपिल शर्मा चढला बोहल्यावर

Google+ Linkedin