Mumbai – Goa Vande Bharat | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून एक गोड सरप्राईज मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस या दोन लोकप्रिय गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना यंदा गणेशोत्सवाच्या काळात ‘उकडीचे मोदक’ वाटण्यात येणार आहेत.
गणपती भक्तांसाठी खास निर्णय :
कोकणातील गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबईहून गावाकडे रवाना होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या भावनांचा आदर करत खास निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वतीने २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) ते अनंत चतुर्दशीपर्यंत वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला उकडीचे ताजे मोदक दिले जाणार आहेत.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या संयुक्त विद्यमानं गणपतीसाठी कोकणमार्गावर अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, ही पावले नियोजनपूर्वक उचलली जात आहेत. (Mumbai – Goa Vande Bharat)
Mumbai – Goa Vande Bharat | वंदे भारत एक्सप्रेसचं वेळापत्रक (मुंबई-गोवा) :
गाडी क्रमांक 22229 (CSMT-मडगाव):
या दिवशी सुरु : सोमवार, बुधवार, शुक्रवार
निघते: 05:25 AM CSMT
पोहोचते: 03:30 PM मडगाव
गाडी क्रमांक 22230 (मडगाव-CSMT):
या दिवशी सुरु : मंगळवार, गुरुवार, शनिवार
निघते: 12:20 PM मडगाव
पोहोचते: 10:25 PM CSMT
सध्या कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू आहे, त्यामुळे काही वेळापत्रकात बदल शक्य आहेत. (Mumbai – Goa Vande Bharat)
का खास आहे ही सेवा? :
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रत्येक घरासाठी खास असतो. गणरायाचे स्वागत करताना ‘उकडीचे मोदक’ हे अपरिहार्य मानले जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यंदा मोदक वाटून प्रवाशांना भावनिक आणि सांस्कृतिक जोड दिली आहे.