Ladki Bahin Yojana | रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील लाखो बहिणींना सरकारकडून दिलासा देणारी आनंदवार्ता मिळाली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ₹1500 सन्मान निधी थेट जमा केला जाणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस वितरित केला जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी एक्स द्वारे दिली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थोडा आर्थिक आधार मिळणार असून, रक्षाबंधनासारख्या भावनिक सणाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम बहिणींना खास भेट ठरणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा निर्णय :
ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून, त्यामधून दरमहिन्याला ₹1500 सन्मान निधी पात्र महिलांना दिला जातो. जुलै 2025 चा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच दिला जाणार असल्यामुळे बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Ladki Bahin Yojana Installment)
योजनेत लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थिनींची निवड ठरावीक निकषांनुसार करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने रक्कम जमा केली जाते.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 1, 2025
Ladki Bahin Yojana | थेट खात्यात जमा होणार रक्कम :
रक्षाबंधनपूर्वीच रक्कम खात्यात जमा करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या गेल्या आहेत. या निर्णयामुळे महिलांमध्ये योजना अधिक विश्वासार्ह ठरेल आणि भविष्यात या योजनेचा विस्तार करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. (Ladki Bahin Yojana Installment)
राज्यातील हजारो महिला आता सन्मान निधीची वाट पाहत आहेत. हा निधी वेळेवर मिळाल्यास त्यांच्या सणाची तयारी आणि आत्मसन्मान दोन्ही जपले जातील. शासनाकडूनही वेळोवेळी लाभार्थ्यांना SMS/बँक अलर्ट्सद्वारे माहिती दिली जाईल.