Ration Card | राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. ई-केवायसी (Electronic Know Your Customer) न करणाऱ्यांचे नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.
पात्र लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया :
सरकारकडून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) मोफत किंवा सवलतीच्या दरात तांदूळ, गहू, साखर यासारखे अन्नधान्य रेशनद्वारे दिलं जातं. मात्र याचा योग्य लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, या उद्देशाने रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.
ई-केवायसी प्रक्रियेमुळे सरकारला हे सुनिश्चित करता येते की, फक्त खरी पात्र कुटुंबेच रेशनचा लाभ घेत आहेत, आणि गैरवापर रोखता येतो. (Ration Card)
Ration Card | ई-केवायसी का आवश्यक आहे? :
– आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केल्याने कार्डधारकांची ओळख निश्चित होते.
– पात्रतेची पडताळणी करता येते.
– बोगस कार्डधारक ओळखता येतात.
– गरजू लोकांपर्यंत अनुदानित धान्याचा योग्य वाटप सुनिश्चित करता येतो.
– सरकारी यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते.
शिधावाटप विभागाने स्पष्ट केलं आहे की, ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाही, त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांचं नाव बोगस कार्डधारक यादीत जाऊ शकतं आणि ते कायमस्वरूपी लाभातून वंचित राहू शकतात.