HDFC बँकेची मोठी घोषणा; ‘या’ लोकांना फायदाच फायदा

मुंबई | HDFC बँकेने ‘सीनियर सिटीझन केअर एफडी’ची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे, जी ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज देणारी खास एफडी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, ही FD खासकरून फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. यामध्ये 0.25 टक्के अतिरिक्त व्याज दिलं जातं.

HDFC | ‘या’ कालावधीपर्यंत करू शकता गुंतवणूक

HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सीनियर सिटीझन केअर एफडीची अंतिम मुदत 10 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ आता गुंतवणूकदार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एफडीचा लाभ घेऊ शकतात.

सीनियर सिटीझन केअर एफडीमध्ये, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदराच्या तुलनेत 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दराव्यतिरिक्त 0.25 टक्के वेगळा व्याजदर दिला जात आहे. अशा प्रकारे, ही एफडी करणाऱ्या गुंतवणूकदाराला बँकेकडून 0.75 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल.

सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत बँक गुंतवणूकदारांना 7.75 टक्के व्याज देते आहे. हा परिपक्वता कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त आहे.

एफडीवरील व्याजदर

7 दिवस ते 29 दिवस -3.00 टक्के
30 दिवस ते 45 दिवस – 3.50 टक्के
46 दिवस ते 6 महिने – 4.50 टक्के
6 महिने एक दिवस ते 9 महिने – 5.75 टक्के
9 महिने ते एक वर्षापेक्षा कमी – 6.00 टक्के
एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी – 6.60 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी – 7.10 टक्के
18 महिने ते 2 वर्षे 11 महिन्यांपेक्षा कमी -7.00 टक्के
2 वर्षे 11 महिने ते 35 महिने – 7.15 टक्के
2 वर्षे 11 महिने एक दिवस – 3 वर्षे – 7.00 टक्के
3 वर्षे एक दिवस ते -5 वर्षे -7.00 टक्के
5 वर्षे एक दिवस ते 10 वर्षे -7.00%

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | हुडहुडी वाढणार!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागाला हवामान खात्याचा इशारा

Shani | शनिच्या साडेसातीपासून राहा सावध, नव्या वर्षात ‘या’ राशींना मोठा धोका

Article 370 वर निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले?

Article 370 | सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!