Maharashtra News | सर्वात मोठी बातमी! मराठवाड्यातील ‘या’ भागात नागरिकांना धोका

Maharashtra News | राज्यात यंदाच्या वर्षी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने मराठवाड्यामध्ये दुष्काळाची स्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे या भागात काही ठिकाणी पाण्याबाबात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दूषित पाण्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर, बोअर यांच्यासह जलसाठ्यांचे पाणी नमुने प्रशासनाकडून घेतले जात असतात.

गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील 9 हजार 938 पाणी नमुने घेण्यात आले होते. यातील तब्बल 1 हजार 347 नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

धोका टाळण्यासाठी या जिल्ह्यातील नागरिकांसह ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय, वेळीच जलसाठे शुद्ध करण्यासह तुरटीचा वापर करणे गरजेचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra News: कोणत्या जिल्ह्यात शुद्ध पाणी?

मराठवाड्यातील काही भागात शुद्ध पाण्याची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ग्रामीण भागातून 60 तर शहरी भागातून 38 असे 98 नमुने घेण्यात आले होते. यात एकही नमुना दूषित आढळला नाही, त्यामुळे या तालुक्यात शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

दुषित पाण्याचे नागरिकांवर परिणाम-

राज्यात दुषित पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबरोबरच त्यांना मोठमोठे आजार उद्भवत आहेत. अस्वच्छ पाण्याचे सेवन केल्याने पोट दुखीच्या समस्या वाढतात. काही व्यक्तींना स्टोनचे आजार देखील होतात. तसेच पित्त आणि मळमळ अशा समस्याही उद्भवतात. त्यामुळे वेळीच गावातील प्रदूषण रोखून पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा करणे गरजेचे आहे.

News Title : maharashtra news citizens to need take care

थोडक्यात बातम्या-

Weather Update | हुडहुडी वाढणार!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागाला हवामान खात्याचा इशारा

Shani | शनिच्या साडेसातीपासून राहा सावध, नव्या वर्षात ‘या’ राशींना मोठा धोका

Article 370 वर निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणाले?

Article 370 | सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!