“4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला या”, आदिती तटकरेंचा अंधारेंवर पलटवार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raigad Loksabha | रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. बारामती, शिरूर, साताऱ्याप्रमाणे रायगड लोकसभा मतदारसंघ हा देखील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघात दोन्ही गटांच्या बाजूने प्रचार होताना दिसत आहे. आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. तटकरेसाहेब यंदा तुम्हाला गुलाल लागणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं. (Raigad Loksabha)

त्यावर आता आदिती तटकरे यांनी देखील सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार करत टीका केलीये. 4 जूनला तुम्ही आमच्यासोबतच गुलाल खेळायला या, असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलंय. त्यासोबतच सुषमा अंधारे यांनी सभेमध्ये बोलत असताना सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीवर भाष्य केलंय.

 आदिती तटकरेंचा अंधारेंवर पलटवार

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी भरसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. “एकट्याची उंच उंच माडी, एकट्याचे उंच उंच घर, घरासमोर लांबलचक गाडी, एकट्याला पुरणपोळी साजूक तूप अन् रायगडकरांचं काय? खात्रीनं सांगते खात्रीनं, तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर आदिती तटकरे यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.

“4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला या”

“मी त्यांना मनापासून सांगते की त्यांनी 4 तारखेला आमच्यासोबत गुलाल खेळायला यावं. वैयक्तिक टीका करण्याची रायगडची संस्कृती नसते. त्यांना केवळ तटकरेंची घराणेशाही दिसली. ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत. त्या पक्षाची घराणेशाही दिसली नाही. नाव न घेता ठाकरे घरणेशाहीवर आदिती तटकरे यांनी टीका केलीये. सोयीस्कर घराणेशाहींवर बोलणाऱ्यांवर मी फार काही टीका करू इच्छित नाही”, असा हल्लाबोल आदिती तटकरे यांनी केला.

दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. तर त्यांच्याविरोधात अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे रायगडकर कोणाच्या पदरात आपल्या विश्वासाचं मत टाकणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title – Raigad Loksabha Aditi Tatkare Replied On Sushma Andhare Statement

महत्त्वाच्या बातम्या

“येणार तर अण्णाच”, अभिनेता प्रविण तरडेंनी सांगून टाकला पुणे लोकसभेचा निकाल

“…त्या एका वक्तव्याने माझं वाटोळं झालं”, भरसभेत अजित पवारांनी धरले कान

माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ, शेकडो महिलांवर…

‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव