‘…तर गाठ माझ्याशी आहे’; अजित पवारांनी दिला दम

Ajit Pawar | राज्यात सर्वाधिक चर्चा बारामती लोकसभा मतदार संघासंदर्भात होत आहे. या ठिकाणी पवार कुटुंबात लढत होत आहे. शरद पवार आणि अजित पवार समोरासमोर आले आहेत. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अजित  पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं आहे. नणंद-भावजयमधील या लढतीची चर्चा होत आहे. अशात अजित पवारांनी एक वक्तव्य केलं आहे. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम

शिर्सुफळमध्ये बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनो कुणा एकाचं कुंकु लावा आणि मी ज्या कार्यकर्त्यांना पद दिली मानसन्मान दिला आणि जर तो कार्यकर्ता चुकला तर अजित पवार यांच्याशी गाठ आहे, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलंय.

चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सुनेला मतदान करायचं का मुलीला मतदान करायचं हे तुम्ही ठरवा, असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना मतदान करण्यात आवाहन बारामतीकरांना केलं आहे.

चार दिवस सुनेचे येऊ द्या- अजित पवार

चार दिवस सासुचे ही म्हण ऐकी आहे मात्र आता चार दिवस सुनेचे येऊ द्या. एक काळ झाला की सासूदेखील सुनेच्या हातात घराचा कारभार देते. सून चुकल्यास तिला बोलते मात्र कारभार देण्याचं काम तरी करते. तसंत आता सुनेला मतदान करण्याची गरज आहेस, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.

बारामती लोकसभेचा विकास करायचा असेल. तर सुनेत्रा पवारांना मत देणं त्यांना निवडून देणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

एकेकाळी मी देखील मोदींवर टीका करायचो. मात्र खरा विकास मोदींनी केला आहे.देशात 71 हजार कोटीची कर्जमाफी झाली. असं विरोधक सांगतात मात्र राज्याची किती झाली? याचा आकडा एकदा जाऊन बघा. सगळीच कामं मी करतो, असा दावा मी करत नाही मात्र काही वैयक्तिक कामं मी केली आहेत. ती मलाही माहिती आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आपला एकच विरोधक आहे”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव

“पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची”

तरुणांसाठी खुशखबर! स्टार्टअपसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं लोन

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं आयुष्य!

कशाला करतो गॅरंटीची बात!, रॅपच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल