तरुणांसाठी खुशखबर! स्टार्टअपसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं लोन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PMEGP Loan Scheme | आताच्या घडीला तरुण आणि तरुणी ऑफिसमध्ये 9 ते 5 पर्यंत काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्यावर अधिक भर देत आहेत. मात्र, बऱ्याचदा स्वतःचा व्यवसाय करायचा झाल्यास आर्थिक अडचण भासते. व्यवसाय करायचं म्हणल्यास त्यासाठी मोठा निधी देखील लागतो.

पैसे नसल्यामुळे मग तरुणांचं स्टार्टअपचं स्वप्न अपूर्णच राहून जातं. अशात सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. आता प्रत्येक तरुणाचं स्वप्न साकार होईल. सरकार तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजासह लोन देण्याची ही योजना आहे. या लोनद्वारे सरकारची सबसिडी देखील मिळणार आहे. या योजनेचे नाव ‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’ असे आहे. यासाठी तुम्हाला खूप कागदपत्रांची देखील गरज भासणार नाही. कारण, फक्त आधार कार्ड वर तुम्हाला जवळपास 50 लाख रुपये मिळणार आहेत.

योजनेत किती कर्ज मिळेल?

या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम जास्तीत जास्त 50 लाख असू शकते. व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रांसाठी कमाल मर्यादा 20 लाख असू शकते. याशिवाय, लाभार्थ्यांनी सर्वसाधारण (PMEGP Loan Scheme) श्रेणीसाठी 10% आणि विशेष श्रेणीसाठी 5% योगदान देणे आवश्यक आहे. उर्वरित 90% ते 95% बँकेद्वारे वित्तपुरवठा केला जातो.

चालू वर्षासाठी व्याजदर किती?

‘पीएम रोजगार सृजन कार्यक्रम योजना’ मध्ये कर्जाचे व्याजदर 11% ते 12% पर्यंत आहेत. परतफेडीचा कालावधी हा 3 ते 7 वर्षांपर्यंत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही लोन काढून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला लोन (PMEGP Loan Scheme) फेडण्यासाठी बराच कालावधी असेल.

आवश्यक कागदपत्र कोणती?

जात प्रमाणपत्र
प्रवर्ग प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड
प्रकल्प विवरण आणि शैक्षणिक प्रमाणपत्र
उद्योग रेजिस्ट्रेशन नंबर (उद्योग नोंदणी क्रमांक ज्याला कॉर्पोरेट/कंपनी ओळख क्रमांक किंवा CIN म्हणूनही ओळखले जाते)
व्यवसाय संबंधित ओरिजनल कागदपत्रे लागतील.

योजनेसाठी अर्ज कसा करणार?

PMEGP च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
ऑनलाइन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील, एजन्सी तपशील आणि बँक तपशील याबद्दल संपूर्ण माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
आवश्यक कागदपत्रांसह PMEGP कर्ज फॉर्म 2024 सबमिट करा.

News Title: PMEGP Loan Scheme
महत्त्वाच्या बातम्या-

निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!, कांद्यावरील बंदी कायम, ती आकडेवारी जुनी

शरद पवारांचा महायुतीला गंभीर इशारा, म्हणाले…

“भाजपचे उमेदवार धडाधड पाडा, कांद्याकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही”

इशान किशनला बीसीसीआयचा धक्का; केली मोठी कारवाई

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 3 योजना ठरतायेत फायदेशीर!