निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!, कांद्यावरील बंदी कायम, ती आकडेवारी जुनी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Onion Farmer l देशातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. काल केंद्र सरकारने गुजरातमधील उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांत संताप निर्माण झाल्याचे दिसत आहे. कांदा उत्पादक मुद्द्यांवरून भाजपविरोधातील वादळ शमविण्यासाठी खरीप व रब्बी हंगामामध्ये एकूण 99,150 टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे सरकारने काल जाहीर केले होते.

भाजप महाराष्ट्रविरोधी, कांदाउत्पादक शेतकरीविरोधी : विरोधक

मात्र आता यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षभरातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने काल नव्याने कांदा निर्यातीला परवानगी दिली नसल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे. कांद्यावरील निर्यातबंदीवरून विरोधी पक्षाने भाजपविरोधात आवाज उठवला आहे. कारण राज्यातील विरोधक पक्ष भाजपला महाराष्ट्रविरोधी, कांदाउत्पादक शेतकरीविरोधी असल्याचे ठरवत आहे.

‘पांढरा कांदा फक्त निर्यातीसाठी उत्पादित केला जात असतो. आखाती देश आणि युरोपीयन युनियनमधील अशा काही देशांनाच पांढऱ्या कांद्याची निर्यात होत असते. पांढऱ्या कांद्याला लाल कांद्याच्या तुलनेत उत्पादन खर्च देखील जास्त आहे. म्हणून पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे अशी सारवासारव केंद्र सरकारकडून केली जात आहे.

Onion Farmer l कांदा निर्यातीला नव्याने परवानगी दिली नाही :

अशातच लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुख्य कांदाउत्पादक पट्टय़ातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात कांदाउत्पादक मतदारांची संख्या देखील मोठी असल्यामुळे या तीन मतदारसंघांत भाजपला फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात किती कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे.

मात्र केंद्र सरकारने याची एकत्रित आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रत्यक्षात कांदा निर्यातीला नव्याने परवानगी दिलेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे असा आरोप निफाड येथील कांद्याचे व्यापारी आतिश बोराडे यांनी केला आहे.

News Title – The Central Government Has Not Given New Permission For Onion Export But The Open Export Of Onion From The Country Is Closed Amy

 महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा महायुतीला गंभीर इशारा, म्हणाले…

“भाजपचे उमेदवार धडाधड पाडा, कांद्याकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही”

इशान किशनला बीसीसीआयचा धक्का; केली मोठी कारवाई

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 3 योजना ठरतायेत फायदेशीर!

महायुतीला निवडणूक सोपी नाही, कारण राज्यात… छगन भुजबळांनी सांगितला नेमका मुद्दा