महायुतीला निवडणूक सोपी नाही, कारण राज्यात… छगन भुजबळांनी सांगितला नेमका मुद्दा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chhagan Bhujbal | अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी भाजपच्या 400 पार नाऱ्यासंदर्भात मोठा दावा केलाय. एका मुलाखतीमध्ये बोलताना भुजबळ यांनी एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट असल्याचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

राज्यात 2014 आणि 2019 मध्ये झालेली निवडणूक एनडीएला फार सोपी गेली. त्यांनी राज्यात 48 पैकी 41 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या.मात्र, यावेळी त्यांना निवडणूक तेवढी सोपी नसणार आहे. कारण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी भाजपच्या ‘अब की बार 400 पार’या घोषणेबाबतही भाष्य केलं. भाजपच्या या घोषणेमुळे घटनेमध्ये बदल केला जाणार असल्याचं मत मतदारांमध्ये निर्माण झालं आहे. पंतप्रधान मोदींनी मात्र संविधान मजबूत असून ते स्वतः बी.आर.आंबेडकरांनाही बदलता नसतं आलं असं बऱ्याचदा सांगितलं आहे. पण, जनतेमध्ये वेगळाच संदेश जात आहे. आता मतपेट्या उघडल्यावरच परिणाम दिसून येईल. असं भुजबळ म्हणाले.

पुढे त्यांनी लोकांचा विश्वास अजूनही नरेंद्र मोदींवर आहे आणि त्यांनी एक मजबूत सरकार बनवावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही भुजबळ म्हणाले. यावेळी बारामतीच्या राजकारणाबाबतही भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

पवार-ठाकरेंच्या मागे सहानुभूतीची लाट

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना होणार आहे. याबाबत भुजबळ (Chhagan Bhujbal )  म्हणाले की, माझ्यासाठीही हे सगळं काही दुःखदायक आहे की, जे लोक एकाच घरात इतकी वर्षे एकत्र राहत आहेत. जे काही घडत आहे ते अनेकांना आवडत नाही. यात दोष कोणाचा, हा वेगळा मुद्दा आहे. पण हे घडले नसते तर खूप चांगले झाले असते.

राज्यात 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली. यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. त्यानंतर एक वर्षानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही असंच काही घडलं. अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि भाजपशी हातमिळवणी केली. आता राज्यात महायुतीचं सरकार आहे. आता या निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती, हे आगामी काळातच दिसून येईल.

News Title- Chhagan Bhujbal big statement on Lok Sabha elections

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ तीन चुका कधीच करू नका; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार