‘या’ तीन चुका कधीच करू नका; नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय तत्वज्ञानी, राजकीय धोरण निर्माता, शिक्षक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही न काही तत्वज्ञान सांगितलं आहे.

जीवनात येणाऱ्या अडचणी असो किंवा जीवनात मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, याबाबत त्यांनी काही तत्वे सांगितली आहे. त्यांच्या या तत्वांचे पालन केले तर जीवनातील कोणत्याही अडचणीतून तुम्ही सहजरीत्या बाहेर पडू शकता.

चाणक्य यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काही चुका कधीच करू नये, असं म्हटलं आहे. तुम्ही या 3 चुका केल्या तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चात्ताप होईल. यशस्वी होण्याची पहिली पायरी चढायची असेल तर मनुष्याने या 3 चुका कधीच करू नये, असं चाणक्य म्हणतात. आता या चुका कोणत्या, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.

‘या’ तीन चुका कधीच करू नका

इतरांशी तुलना करू नये : चाणक्य म्हणतात की, मनुष्याने कधीच इतरांशी तुलना करू नये. जो व्यक्ती इतरांची समृद्धी बघून त्याच्याशी तुलना करतो तो सतत आपल्या कमजोरी काढत असतो. म्हणजेच त्याला आपल्यात नेहमीच काही गोष्टींची कमी खुणावते. तो आपल्या कार्यक्षमतेवर शंका घेतो. इतरांशी तुलना करण्याच्या नादात तो आपलंच नुकसान करून घेतो. त्यामुळे आपल्याला जे येतं त्याकडे अधिक लक्ष देऊन त्यामध्ये अजून कर्तृत्ववान बनण्याचा प्रयत्न करायला हवा.

मधुर वाणी कायम ठेवा : चाणक्य म्हणतात (Chanakya Niti) की आपली वाणी नेहमी मधुर असायला हवी. म्हणजेच आपल्या बोलण्यात एक आदर असायला हवा. मधुर भाषा तुमचे नाते बनवू शकते किंवा तोडू शकते. त्यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित लोक असोत किंवा इतर लोक असोत, तुम्ही त्यांच्याशी खूप शांततेने आणि आदराने बोलायला हवे. तुमच्या वाणीमुळे तुम्ही नवीन संबंध जोडतात.यामुळे तुम्हाला भविष्यात मोठे फायदे होतात.

आळस टाळणे : आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. हे आपण लहानपणापासूनच ऐकलं आहे आणि वाचलं आहे.आळशी व्यक्ती काम चुकार असतात. त्यांना आलेल्या संधीचं सोनं करता येत नाही. यामध्ये त्यांचाच तोटा असतो. आळशी स्वभावामुळे त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे (Chanakya Niti)हातातली संधी देखील ते गमावून बसतात. याचा त्यांना मग आयुष्यभर पश्चात्ताप होतो.

News Title- Chanakya Niti Dont make mistakes that you will regret

महत्त्वाच्या बातम्या-

काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार

मध्यरात्री घडलं असं काही की निवडणूक भरारी पथकाची ही झोप उडाली