काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather | राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडून गेलाय. त्यामुळे येथे तापमानात मोठी घट झाल्याचं पाहावयास मिळालं. नागरिकांना पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळला होता. आता पुन्हा उन्हाचा पारा वाढत असल्याचं चित्र दिसून येतंय.

मुंबई आणि ठाण्यामध्ये तर तापमान प्रचंड वाढलंय. येथे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून उष्ण व दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी 32.6 तर सांताक्रूझ केंद्रात 35.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

‘येथे’ उष्णता वाढणार

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच ठाणे, रायगड जिल्ह्यात आज रविवारी (28 एप्रिल)आणि सोमवार (29 एप्रिल) या दोन दिवशी तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामान  (Maharashtra Weather)  विभागाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात शनिवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक 43.6 तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

‘या’ भागावर अवकाळीचं संकट कायम

मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे.

आता हवामान विभागाकडून बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या भागात वादळी वारे आणि विजांसह  (Maharashtra Weather) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या भागात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. येत्या दोन-तीन दिवसात येथे ढगाळ वातावरणसह पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे.

News Title : Maharashtra Weather Heat wave and rain warning

महत्त्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सर्वात मोठी माहिती समोर!

ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार

मध्यरात्री घडलं असं काही की निवडणूक भरारी पथकाची ही झोप उडाली

या दोन राशींसाठी पुढील काही तास महत्वाचे; मिळणार पैसाच पैसा