या दोन राशींसाठी पुढील काही तास महत्वाचे; मिळणार पैसाच पैसा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ६

वृषभ:- संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ७

मिथुन:- नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक १

कर्क:- घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ४

सिंह:- नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ९

कन्या:- आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे. शुभ रंग लाल, शुभ अंक ३

तूळ:- कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ५

वृश्चिक:- मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. शुभ रंग निळा, शुभ अंक ८

Today Horoscope l धनू:- कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी. शुभ रंग विटकरी, शुभ अंक १

मकर:- अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ४

कुंभ:- तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आर्थिक बाजू कठोर हौल. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ६

मीन:- जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ९

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा

“मी पद्मसिंह पाटील आणि राणांना गार करून आलोय, तानाजी सावंत तू किस झाड की पत्ती है”

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; स्थानिकांच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी, ‘या’ मतदारसंघातून लढणार