पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; स्थानिकांच्या दाव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News Koyta Gang | पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात केवळ राज्यातूनच नाहीतर देशातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र सध्या पुणे शहर हे गुन्हेगारीसाठी प्रसिद्धीस आलं आहे. सांस्कृतिक राजधानी ओळख असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार होत आहेत. येथील सुरक्षा यंत्रणेवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांआधी प्रेयसीने एका तरूणाला रिलेशनशीपबद्दल नकार दिल्याने त्या तरूणाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न  केला. ही घटना देखील पुण्यात घडली होती. अशातच आता पुणे शहरात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कोयता गँगची (Pune News Koyta Gang) दहशत झाली आहे. बिबवेवाडीत कोयता गँगने अत्यंत घृणास्पद कृत्य केलंय. (Pune News Koyta Gang)

पुण्यातील बिबवेवाडीत कोयता गँगची दहशत

पुण्यातील बिबवेवाडीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोयता गँगने (Pune News Koyta Gang) बिबवेवाडीतील सुपर परिसरामध्ये कोयत्याने हल्ला केला. कोयता गँगची दहशत कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. कोयता गँगच्या 10 ते 15 गुंडांना 5 रिक्षा आणि 15 ते 20 दुचाकींवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये एका चारचाकी वाहनाचा देखील समावेश होता. गाड्यांचे नुकसान करून दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

या घटनेनं बिबवेवाडीत भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. कोयता गँगविरोधात (Pune News Koyta Gang) पोलीस यंत्रणा तक्रार नमूद करून घेत नसल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे. यामुळे लहान मुलं, इतर लोकं प्रचंड दहशतीत आहेत.

कोयता गँगला पोलिसांकडून पाठबळ, स्थानिकांचा दावा

अप्पर भागात हे प्रकरण वाढू लागलं आहे. पोलिसांना कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी अपयश येत असल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हेगारांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली जाते. सर्व पुरावे पोलिसांना दिले तरीही ते पुरावे नष्ट केले जातात. याचा अर्थ पोलिसांकडून मारेकऱ्यांना पाठबळ असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. घटना होऊन आता 12 हून अधिक तास होऊन गेले तरीही पोलिसांनी पंचनामे केले नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी पुण्यातील इतर कुख्यात गुंडांना पोलिसांनी चांगलंच सुनावलं होतं. त्यांना तंबी देण्यात आली होती. मात्र तरीही पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस गुन्हे कमी व्हायचे सोडून गुन्हे वाढू लागले आहेत.

News Title – Pune News Koyta Gang Update

महत्त्वाच्या बातम्या

रवीना टंडनच्या लेकीचं मलायकाच्या लेकाशी जुळलं सूत!, रिलेशनशीपबाबत रवीनाचा लेकीला हा मोठा सल्ला

अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक

सचिन आणि सु्प्रिया पिळगांवकर यांची मुलगी खरंच दत्तक आहे का?, श्रियाने स्वतःच सत्य सांगितल्यानं मोठी चर्चा

“…त्यांना फक्त एकच गोष्ट मनापासून करायची इच्छा होती”, ऋषी कपूर यांच्याबद्दल मुलीचा मोठा खुलासा

गर्लफ्रेंड नाही म्हणून…, मित्रानेच आपल्या मित्रासोबत केलं अत्यंत धक्कादायक कृत्य