अमरावती मतदारसंघातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, कारण आहे फारच धक्कादायक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Loksabha Election 2024 | राज्यातच नाहीतर देशात आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे. काही ठिकाणी लोकशाहीचा हक्क बजावला जात आहे. तर काही ठिकाणी मतदान करण्यावरच बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळतंय. याआधी उमेदवारांना मत दिलं मात्र त्यांनी मुलभूत सोयीसुविधा पुरवल्या नसल्याने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील सहा गावांनी मतदान करण्यापासून विरोध केला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

‘या’ सहा गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार

अमरावती मतदारसंघातील मेळघाट येथील रंगबेली, कुंड, धोकडा, खामदा-किन्हीखेडा, आणि खोपमार या सहा  गावांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत आमच्या गावांना कोणतीही मुलभूत सुविधा दिली नसल्याने सहा गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. याचा फटका हा उमेदवारांना बसणार असल्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा सुरू आहे. राज्यात अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, वर्धा या आठ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. दुसरीकडे अमरावतीच्या मेळघाट येथील आदिवासी भागात सहा गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, पक्के रस्ते, आरोग्य केंद्र या मुलभूत सोयीसुविधा दिल्या नसल्याने सहा गावातील ग्रामस्थांनी मतदान करण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकला आहे. एकही व्यक्ती मतदान केंद्रावर जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.  (Maharashtra Loksabha Election 2024)

दोन नवरदेवांनी बजावला मतदानाचा अधिकार

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील निलेश उर्फ विक्की महादेव मारबदे आणि खरबी मांडवगड येथील सुधीर औधकर यांनी बोहल्यावर चढण्याआधी मतदान केलं. लग्नमंडपात जाण्यापूर्वी घोड्यावर बसण्याआधी दोन्ही मतदारांनी खरबी मांडवगड येथे मतदान केंद्रावर मतदान केलं.

News Title – Maharashtra Loksabha Election 2024 Phase 2 Aggressive Posture Of Six Villages At Melghat Amravati Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ बड्या नेत्याचा शिंदेसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

…त्या वक्तव्यावरून अजितदादांना दिलासा तर शरद पवार गटाला झटका

बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी