बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IIT JEE Advanced 2024 l विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. JEE Advanced Exam 2024 साठी नोंदणी उद्यापासून म्हणजेच शनिवार, 27 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी JEE Advanced च्या jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

परीक्षा कधी होणार? :

JEE Advanced 2024 साठी अर्ज 27 एप्रिलपासून सुरू होतील आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे. नोंदणीसाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 10 मे 2024 आहे. 17 मे रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील आणि 26 मे पर्यंत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.

JEE Advanced Exam 2024 च्या परीक्षा रविवार, 26 मे 2024 रोजी घेली जाणार आहे. हा पेपर दोन शिफ्टमध्ये होणार असून पहिल्या पेपरची वेळ 9 ते 12 आणि दुसऱ्या पेपरची वेळ 2.30 ते 5.30 दरम्यान असेल. tकोणतेही अपडेट किंवा तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

IIT JEE Advanced 2024 l कट ऑफ काय आहे? :

कट ऑफ श्रेणीनुसार आहे. उदाहरणार्थ, सामान्य श्रेणीसाठी ते 100.0000000 वरून 93.2362181 वर गेले आहे. यावेळी एकूण 97351 उमेदवार येत आहेत. त्याचप्रमाणे, PWBD, OBC, EWS आणि उमेदवारांच्या इतर श्रेणींसाठी कट ऑफ भिन्न आहे.

अर्ज करण्यासाठी, महिला उमेदवार, SC, ST आणि PWBD श्रेणीतील उमेदवारांना 1600 रुपये शुल्क भरावे लागेल. उर्वरित उमेदवारांची फी 3200 रुपये आहे. शुल्क फक्त ऑनलाइन स्वरूपात भरता येईल.

News Title : IIT JEE Advanced 2024

महत्त्वाच्या बातम्या –

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

विवाह, गृहप्रवेश ते नामकरण..मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?; जाणून घ्या संपूर्ण यादी

12 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा लेटेस्ट 5G स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स

तुम्ही खात असलेलं तूप शुद्ध आहे की अशुद्ध?, ‘या’ टिप्समुळे फसवणूक टळू शकते

राहुल गांधीचं भवितव्य आज ठरणार; देशातील 88 मतदारसंघात मतसंग्राम