शरद पवारांची प्रकृती बिघडली; प्रसिद्ध अभिनेत्याने केली भावूक पोस्ट, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाची काल सभा पार पडली. या सभेतही शरद पवार पूर्णवेळ उपस्थित होते. त्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar यांची प्रकृती बिघडली

शरद पवार (Sharad Pawar) यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यावर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेची (Hemant Dhome) पोस्ट चर्चेत आली आहे.

बारामतीमध्ये शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी तीन सभा घेतल्या. प्रकृती साथ देत नसतानाही शरद पवारांनी त्यांच्या प्रत्येक उमेदवारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पवारांना याचा त्रास झाल्याचं दिसतंय. यामुळे हेमंत ढोमेने शरद पवारांवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच त्याने शरद पवारांना काळजी घेण्याचीही विनंती केली आहे.

कृपया स्वतःची काळजी घ्या- हेमंत ढोमे

हेमंत ढोमेने ट्विट करत शरद पवारांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, आदरणीय साहेब, आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे. पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो. हेमंत ढोमेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केलीये.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शरद पवार हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेत फिरत आहेत. बारामतीच्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मी किमान 40 सभा घेऊन आलो आहे. या सततच्या दगदगीचा परिणाम तब्येतीवर होत असतो. साहजिकच या सगळ्याचा परिणाम गळ्यावर होतो. त्यामुळे मी आज या स्थितीत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, शरद पवार यांना डॉक्टरांनी दोन दिवस भाषण करु नका, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता कुटुंबिय शरद पवार यांची काळजी घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुढील 3 दिवस धोक्याचे; हवामान विभागाने दिला अत्यंत महत्त्वाचा इशारा

‘पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच’; योग्य लाईनवर सुरु असलेल्या प्रचारानं भाजपचं पारडं जड

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

समंथाचे नको तसले फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

बायको म्हणावी की कसाई; नवऱ्याला बांधून ठेवलं नंतर प्रायव्हेट पार्टला दिले चटके