समंथाचे नको तसले फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Samantha Ruth Prabhu | साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचा सामना करतेय.परदेशातील उपचारानंतर ती सध्या भारतात त्यावर विविध उपचार घेत आहे. अशात तिने उपचारादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये समंथा इन्फ्रारेट साऊना थेरपी घेताना दिसत होती.

मात्र, नंतर जे काही घडलं ते धक्कादायक होतं. कारण, अवघ्या काही क्षणात समंथाचे काही फेक न्यूड फोटो व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमुळे एकच खळबळ उडाली. चाहत्यांनी यावर संताप व्यक्त केलाय. आता संबंधित युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

डीपफेकच्याअनेक अभिनेत्री शिकार झाल्या आहेत. अभिनेत्री कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, रश्मिका मंदाना, नोरा फतेही यांचे डीपफेक फोटो आणि व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता अभिनेत्री समंथा रुथ प्रभू याची शिकार झाली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

समंथाची पोस्ट नेमकी काय?

‘बरं होण्यासाठी आणि आजारपणातून बाहेर पडण्यासाठी सतत पर्यायी पद्धतींचा शोध घेत आहे’, असं लिहित समंथाने तिच्या थेरपीचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तिने इन्फ्रारेट साऊना थेरपीचे फायदे देखील सांगितले होते.

‘स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारते, चयापचय वाढवतं, शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते, ऊर्जा वाढते, शरीर डिटॉक्स होते, सेल्युलाइट कमी होतात, त्वचा टवटवीत होते, ताकद वाढते, सांधे आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात आणि लवचिकता वाढते’, अशी फायद्यांची यादीच तिने (Samantha Ruth Prabhu) फोटो पोस्टमध्ये सांगितली होती.

समंथा झाली डीपफेकची शिकार?

मात्र, या पोस्टनंतर काही सोशल मीडिया युजर्सने तिचे फेक फोटो व्हायरल केले. समंथानेच (Samantha Ruth Prabhu) तिच्या स्टोरीमध्ये हे न्यूड फोटो पोस्ट केले आणि लगेच डिलिट केले, असा दावा या युजर्सनी केला आहे. तर, चाहत्यांकडून हे वृत्त धादांत खोटं असल्याचं म्हटलं जातंय.चाहत्यांनी आता या युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या समंथा चर्चेत आली आहे.

News Title –  Samantha Ruth Prabhu Fake Pictures viral 

महत्त्वाच्या बातम्या-

बायको म्हणावी की कसाई; नवऱ्याला बांधून ठेवलं नंतर प्रायव्हेट पार्टला दिले चटके

रोहित पवारांचा धक्कादायक दावा; अजित पवार अडचणीत?

“..तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं”; नाशकात शांतीगिरी महाराजांनी वाढवलं महायुतीचं टेंशन

नाशिकच्या राजकारणात जरांगे पाटलांची एंट्री?; घडामोडींना वेग

येत्या सहा दिवसांत ‘या’ राशींचे नशीब पालटणार; संपत्तीत होणार चिक्कार वाढ