“..तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं”; नाशकात शांतीगिरी महाराजांनी वाढवलं महायुतीचं टेंशन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. येथे महायुतीमध्ये अगोदर उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती. यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात बराच काळ तणावही राहिला. अखेर ही सीट शिंदे गटाला मिळाली.

नाशकात शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा झाली आहे. तर, महाविकास आघाडीकडून येथे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशात नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने महायुती आणि सोबतच महाविकास आघाडीचं टेंशन वाढवलं आहे.

शांतीगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज चर्चेत आले आहेत. नाशिकमध्ये महायुतीकडून तिकीट मिळावे अशी शांतीगिरी महाराजांची ईच्छा होती, उमेदवारी अर्ज भरतांना त्यांनी एबी फॉर्म मिळाला नसतांना देखील शिवसेनेच्या नावाने तो भरला. त्यामुळे महाराजच युतीचे उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

मात्र, महायुतीकडून येथे हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे बाबाजी भक्त परिवार नाराज झाले. शांतीगिरी महाराजांनी देखील माघार घेतली नाही. त्यांनी थेट अपक्ष लढण्याचा (Nashik Lok Sabha) निर्धार केला आहे. याचा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

महायुतीचे हेमंत गोडसे यांचं टेंशन वाढलं?

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासही सुरुवात केली आहे. शांतिगिरी महाराजांचे शहरभर भलेमोठे होर्डींग्स लावण्यात आले आहेत. ‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’ असा मजकूर या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे.

आज नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस असून स्वामी शांतीगिरी महाराज उमेदवारी अर्ज मागे घेणार काय?, याबाबत बोललं जातंय.  दुसरीकडे,  हेमंत गोडसे यांनी मात्र महाराजांकडून तडजोडीची अपेक्षा व्यक्त केली आहे. “शांतीगिरी महाराजांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि ते माघार घेतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांचा आम्ही सन्मान करतो. धार्मिक स्थळं असतील किंवा इतर त्यांच्या मागण्या आम्ही मार्गी लावू.”, असं हेमंत गोडसे म्हणाले आहेत. त्यामुळे (Nashik Lok Sabha) नाशिकमधून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title-  Nashik Lok Sabha Shantigiri Maharaj hordings in discussion

महत्त्वाच्या बातम्या –

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांवर सूर्य आग ओकणार; हवामान विभागाचा इशारा

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

“धोनीने खेळूच नये, चेन्नईने त्याच्या जागी..”; धोनी शून्यावर बाद झाल्याने ‘हा’ खेळाडू संतापला

बारामतीत प्रचार थंडावला, शरद पवारांनी लावली टाईट फिल्डींग

“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”