बारामतीत प्रचार थंडावला, शरद पवारांनी लावली टाईट फिल्डींग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha 2024 | बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) मतदारसंघाचा प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. कालचा दिवस अनेक कारणाने गाजला. प्रचारसभेत दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. प्रचारसभेसाठी जनसमुदाय लोटला होता. याचदरम्यान बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) मतदारसंघात शरद पवार यांनी त्यांच्याकाळातील जुन्या प्रचार पद्धतीचा वापर करत बारामती लोकसभा मतदारसंघात फिल्डींग लावली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यातील मतदान बुथ केंद्रावर कामं वाटून दिली आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांची फिल्डींग

बारामती मतदारसंघात (Baramati Loksabha 2024) एकूण 23 लाख 72 हजार मतदार आहेत. उद्या 7 मे रोजी मतदार बांधव आपलं मत देण्यासाठी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जातील. यासाठी शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघात आपल्या लोकांना कामं ठरवून दिली आहेत. भोर, पुरंदर,वेल्हा,मुळशी, इंदापूर, दौंड आणि बारामती यांचा या बारामती लोकसभा (Baramati Loksabha 2024) मतदारसंघात समावेश होतो. त्यापैकी प्रत्येक तालुक्यातील बुथ यंत्रणा सांभाळण्यासाठी त्यांनी कामं वाटून दिली आहेत.

भोऱ, वेल्हा, मुळशी, येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी बुथ केंद्राची कामगिरी हातात घेतली. पुरंदर तालुक्यात रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि संजय जगताप यांना जबाबदारी दिली आहे. तर बारामती तालुक्यात श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार यांना बुथ केंद्रीची जबाबदारी दिली आहे. तर दौंड येथे नामदेव ताकवने काम करणार आहेत.

रोहित पवार भावूक

कालचा प्रचाराचा दिवस चांगलाच रंगून गेला होता. प्रचारसभेत एकाबाजूला रोहित पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी रोहित पवार यांची मिमिक्री केली. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील कालच्या प्रचारसभेनं जोर धरला. त्यानंतर कालची प्रचारसभा ही शरद पवार यांच्या भाषणाने लक्षवेधी ठरली. त्यांचा घसा बसला होता. शरद पवार यांनी राज्यभरात तब्बल आपल्या वयाएवढ्या (80) सभा घेतल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रकृतीला घेऊन आजची काम थांबवली आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगितलं होतं. मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या 7 मे रोजी 2516 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहेत. त्यासाठी 13 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 23 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद राहणार आहेत. बारामती, पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदारसंघात आठवडे बाजार बंद राहणार आहेत.

News Title – Baramati Loksabha 2024 Sharad Pawar Responsibility To His Party Leader

महत्त्वाच्या बातम्या

मी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलीय का?, मराठा समाजाच्या विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या

तुमचे रक्त माझे चित्र काढण्यासाठी सांडण्यापेक्षा… फडणवीसांचा कार्यकर्त्याला मोलाचा सल्ला

शरद पवार यांची तब्येत बिघडली, डॅाक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला

पुढील दोन दिवसात ‘या’ दोन राशींना प्रचंड धनलाभ होईल

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल