“आढळराव आणखी किती खोटं बोलणार आहात?”

Shirur Loksabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या विरोधात पुरावे दाखवले. या प्रकरणावर माध्यमांशी बोलत असताना आढळराव म्हणाले की, पुराव्यांचा माझ्या कंपनीसोबत काही संबंध नाही, पाणबुडी संबंधीत माझी कंपनी नाही. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी याप्रकरणावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमुळे आता आढळराव पाटील हे चांगलेच गोत्यात आले आहेत.

मतदानासाठी काही तास उरले आहेत. जसजशे तास कमी होत आहेत तशी आढळराव पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आढळराव पाटील यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात संसदेत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी भाष्य करत पुरावे दिले आहेत. मात्र आता हे पुरावे माझ्या कंपनीसंबंधीत नसल्याचं आढळराव म्हणालेत.

“तुम्ही पुरावे द्या मी राजकारणातून बाहेर पडेल”

आढळराव यांनी संसदेमध्ये स्वत:च्या कंपनीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर आरोप केले. त्यावर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना पुरावे बाहेर काढण्याचं आव्हान दिलं. अमोल कोल्हे यांनी ते आव्हान पार पाडलं. कोल्हे यांनी पुरावे बाहेर काढले. यामुळे आढळरावांच्या अडचणीत वाढ झाली. त्यानंतर आढळराव यांनी अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देणार नसल्याचं सांगितलं. ते मला आव्हान प्रतिआव्हनात अडकवून ठेवतात. त्यानंतर आढळरावांनी अमोल कोल्हेंच्या पुराव्याबाबत आणि त्यांच्या कंपनीबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तो व्हिडीओ आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओ व्हायरल

अमोल कोल्हे यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्या व्हिडीओने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माध्यमांनी आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या पुराव्याबाबत विचारलं असता, त्यांनी हे पुरावे माझ्या कंपनीसंबंधीत नाही असं सांगितलं. मी पाणबुडी बनवतो का? असं माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सवाल केला. मात्र आढळराव खोटं बोलत असल्याचं अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून उघडकीस आलं आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर कंपनीची माहिती येते. त्यामध्ये ‘Submarine’ असा शब्द त्याठिकाणी येतो. ‘Submarine’ चा मराठी अर्थ हा पाणबुडी असा होतो. असं त्या व्हिडीओमध्ये दर्शवण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे आढळराव पाटील हे खोटं बोलत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून “आढळराव अजून किती खोटं बोलाल?” असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. काही तासांवर शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत आढळराव पाटील हे गोत्यात येऊ लागले आहेत. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. मतदारांचा नकारात्मक परिणाम आढळरावांच्या पत्थ्यावर पडणार का हे पाहणं गरजेचं असणार आहे.

News Title – Shirur Loksabha 2024 Amol Kolhe Share Adhalrao Patil Statement Video

महत्त्वाच्या बातम्या

राहा कपूरची चाचूसोबत फुल्ल धम्माल-मस्ती; क्युट व्हिडीओ तूफान व्हायरल

जवळच्या व्यक्तीकडूनच अनन्या पांडेच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल खुलासा, बाॅलिवूडमध्ये एकच खळबळ!

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पुण्यात मेट्रोचे… मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

श्रीरंग बारणेंचं काम केलं नाही, तर राजकीय भवितव्य धोक्यात!; अजितदादांच्या दट्ट्याने सगळी राष्ट्रवादी लागली कामाला

“ब्लाऊज काढून तुझी ब्रा…”; अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल नव्या खुलाश्याने बॅालिवूडमध्ये एकच खळबळ