सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पुण्यात मेट्रोचे… मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

Pune News Murlidhar Mohol

Pune News | सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी मेट्रोचा मार्गाचा (Pune Metro) विस्तार करून, त्याला पीएमपी, एसटी, रिक्षा या वाहतुकीच्या साधनांची जोड देणार असून त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Loksabha) भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी व्यक्त केला.

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार रॅली-

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर परिसरात (Pune News) मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापू पठारे, सतीश मस्के, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मंगेश गोळे, अशोक कांबळे, शंकर संगम, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे, ऐश्वर्या जाधव सहभागी झाले होते.

मोहोळ म्हणाले, एक दशकाहून अधिक काळ पुणे मेट्रो प्रलंबित होती. भाजप सत्तेत आल्यानंतर स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे (Pune News) भूमिपूजन आणि उद्घाटन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही वेगाने सुरू आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली योजना-

मोहोळ (Murlidhar Mohol) पुढे म्हणाले, कालबद्ध पद्धतीने शहरासाठी मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज होती आणि मेट्रोच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करीत आहोत. ही व्यवस्था आणखी व्यापक आणि भक्कम करण्याच्या दृष्टीने मेट्रोचा विस्तार करणेही तितकेच आवश्यक आहे.

नव्या मार्गांमध्ये स्वारगेट ते कात्रज 5.4 किमी, पिंपरी ते निगडी 4.4 किमी, वनाज ते चांदणी चौक 1.5 किमी, रामवाडी ते वाघोली 12 किमी, हडपसर ते खराडी 5 किमी, स्वारगेट ते हडपसर 7 किमी, स्वारगेट ते खडकवासला 13 किमी आणि एसएनडीटी ते वारजे 8 किमी या मार्गाचा समावेश आहे.

News Title: Pune News Murlidhar Mohol on Pune Metro

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीरंग बारणेंचं काम केलं नाही, तर राजकीय भवितव्य धोक्यात!; अजितदादांच्या दट्ट्याने सगळी राष्ट्रवादी लागली कामाला

“ब्लाऊज काढून तुझी ब्रा…”; अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल नव्या खुलाश्याने बॅालिवूडमध्ये एकच खळबळ

अजित पवारांच्या आईने घेतली कुणाची बाजू?, भाऊ श्रीनिवास यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

कंगनाची जीभ घसरली!, प्रचाराच्या गडबडीत ‘या’ बड्या भाजप नेत्यावरच केली टीका

बँकेचे कामे उरकून घ्या;’या’ दिवशी शहरातील बँका राहणार बंद

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .