Shrinivas Pawar | बारामतीच्या राजकारणात पवार कुटुंबाचा नेहमीच दबदबा राहिला आहे. शरद पवार महाराष्ट्रातील दिग्गज नेते असून त्यांच्या कुटुंबातील बरेच जण राजकारणात सक्रिय आहेत. कधी काळी पवारांचा हुकूमी एक्का समजले जाणारे अजित दादा यांनी बंडखोरी केली आणि पवार कुटुंबासह राजकारणातील चक्रेच फिरली.
राष्ट्रवादीचे आता दोन गट पडले आहेत. पक्षातील नेते दोन्ही गटात विभागले आहेत. त्यातच बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. येथे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे.
श्रीनिवास पवारांचा मोठा खुलासा
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या थेट शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या आहेत. दोन्ही उमेदवारांकडून येथे जोरदार प्रचार केला जातोय. बारामतीची निवडणूक म्हणजे या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. अशात अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी एक मोठा खुलासा केलाय.
बंडखोरीनंतर अजित पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं म्हटलं जातंय. स्वतः अजित दादा यांनीही ते बोलून दाखवलंय. त्यात अजित पवारांच्या आईने नेमकी कुणाची बाजू घेतली?, असा सवाल केला जात होता. एकीकडे लेक (अजित पवार)तर एकीकडे दीर (शरद पवार) असताना त्यांच्या आईने कुणाची बाजू घेतली, याबाबत श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी खुलासा केलाय.
अजित पवारांच्या आई कुणाच्या बाजूने?
“अजित दादांच्या निर्णयामुळे सर्वच नाराज आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला, जो कुणालाच पटला नाही. आईला देखील हे सर्वकाही आवडलं नाही. एका बाजूला लेक तर एका बाजूला दीर असल्याने तिने कोणत्याच बाजूने न राहण्याचा निर्णय घेतला. आई चक्क गाव सोडून पुण्यात माझ्या बहिणीकडे राहिलेली आहे.”, असं श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) म्हणाले आहेत.
श्रीनिवास पवार(Shrinivas Pawar) हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू असून ते उद्योजक तथा कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. ते राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसून आले आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यापासून श्रीनिवास पवार सतत त्यांच्यावर टीका करताना दिसून आले आहेत.
News Title – Shrinivas Pawar Big reveal about ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या –
कंगनाची जीभ घसरली!, प्रचाराच्या गडबडीत ‘या’ बड्या भाजप नेत्यावरच केली टीका
बँकेचे कामे उरकून घ्या;’या’ दिवशी शहरातील बँका राहणार बंद
“अजिबात एक रूपया सोडायचा नाही, पण…”; धैर्यशील मोहिते-पाटलांचं मोठं वक्तव्य
“रोहित पवारांना अटक झाली तरी मी…”; राजेंद्र पवारांच्या वक्तव्याने खळबळ
‘आढळरावांनी सरड्या पेक्षा जलद रंग बदलला’; अमोल कोल्हेंची टीका