“अजिबात एक रूपया सोडायचा नाही, पण…”; धैर्यशील मोहिते-पाटलांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

माढा | माढा लोकसभा मतदारसंघामध्ये टफ फाईट सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे नेते धैर्यशील मोहीते पाटील विरूद्ध भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना दिसत आहेत. अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच एका सभेला धैर्यशील यांनी मतदारांना संबोधित करत असताना मोठं विधान केलं आहे. त्याची सगळीकडे सध्या चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरस रंगणार असल्याची चर्चा आहे. दोघेही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता धैर्यशील यांनी नुकत्याच एका सभेमध्ये वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता त्यांच वक्तव्याने रात्रीत राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे.

सभेला संबोधित करत असताना त्यांनी मतदारांना सांगितलं की गाड्याच्या गाड्या फलटणमधून येत आहेत. एक रूपया सोडायचा नाही, मात्र तुतारी वाजवायची, असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर सभेत बोलत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपचं एक सीट सोडलं तर कोणीही निवडून येणार नाही. भाजपचा महाराष्ट्रामध्ये सुपडासाफ होणार आहे. ते भाजपचं नितीन गडकरी यांचं एक सीट सोडलं तर कोणतंही सीट निवडून येणार नसल्याचं ते म्हणालेत. त्यानंतर ते म्हणाले की नितीन गडकरी यांचं सीट का निवडून येईल तर ते त्याठिकाणी कामं करतात, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले आहेत.

“एक रूपया सोडायचा नाही, तुतारी वाजवायची”

“फलटणमधून कंटेनरच्या कंटेनर भरून आले आहेत. हळू हळू गाड्या माढ्याकडे निघतील. मला कळालं की गाड्या माढ्याच्या दिशेने येतील. अजिबात एक रूपया सोडायचा नाही, मात्र आता आपल्याला तुतारी वाजवायची आहे. ही लढाई तुमच्या स्वाभिमानासाठी लढत आहे. माझ्यासाठी नाही”, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणालेत.

भाजपबरोबर असताना आम्ही गुन्हेगार नव्हतो. आता आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे. आम्ही गुन्हेगार आहोत की नाही, माळशिरस, सोलापूर, माढ्यातील जनेतला माहिती आहे. आमचा कारभार स्वच्छ आहे. कोणतीही संस्था चालवताना चढउतार येतच राहतात. त्याला आम्ही जबाबदार आहोत, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले आहेत.

News Title – Dhairyasheel Mohite Patil Big Statement

महत्त्वाच्या बातम्या- 

कोव्हिशिल्डमुळे हार्ट अटॅक आला?, श्रेयस तळपदे म्हणाला…

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; ‘या’ मराठी अभिनेत्याचं निधन

पहाटेच्या शपथविधीबाबत श्रीनिवास पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

महाराष्ट्र हादरला! किराणा मालाच्या दुकानातून होतेय ड्रग्जची विक्री

Post Office ची कमाल योजना; ‘या’ योजनेतून महिन्याला मिळेल 20 हजार रूपये