पहाटेच्या शपथविधीबाबत श्रीनिवास पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shrinivas Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून सतत एकमेकांवर निशाणा साधला जातो. त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे तर हे वाद अजूनच वाढले आहेत.

अशात अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा अजित दादांवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही त्यांनी आपली नाराजी जाहीर केली होती. शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांनी चूक केली, असं ते म्हणाले होते. आता श्रीनिवास पवार यांनी 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली होती. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बोलणी करत होती. मात्र राष्ट्रवादीने आमच्याशी युतीबाबत चर्चा केली असल्याचं फडणवीस म्हणाले होते. आता या घटनेबाबत श्रीनिवास पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

काय म्हणाले Shrinivas Pawar ?

“प्रत्येक पक्षामध्ये चर्चा करण्याचे अधिकार ठराविक नेत्याकडे दिले जातात. हा अधिकार राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांना देण्यात आला होता. 2019 मध्ये भाजपशी चर्चा करण्यास अजित पवार यांना सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांना निर्णय घेण्यास सांगितले नव्हते. चर्चा करुन शपथविधी घ्या, असे सांगितले नव्हते.”, असं श्रीनिवास पवारांनी म्हटलं.

तसंच पुढे ते म्हणाले की, “चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष घेत असतात. मात्र, त्यावेळी जो निर्णय झाला तो शरद पवार यांनी नव्हता घेतला. तो निर्णय जर शरद पवार साहेबांचा असता तर त्यांनी ते सरकार पडू दिलं नसतं. साहेबांनी म्हटलं असतं ठीक आहे, झालं ते झालं, आता पुढे जाऊ या. यामुळे नक्कीच तो निर्णय शरद पवार यांचा नव्हता.”, असा खुलासा श्रीनिवास पवार यांनी केला आहे.

“ज्यांच्यावर आरोप होते, ते..”

यावेळी श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर देखील निशाणा साधला. शरद पवार गट आता स्वच्छ चारित्र्य असलेल्या लोकांचा पक्ष झालाय. ज्यांच्यावर आरोप होते, ते तिकडे गेले. आता पक्षात स्वच्छ चारित्र्याची लोक राहिली आहे. असा टोला श्रीनिवास पवार यांनी लगावला.

News Title- Shrinivas Pawar big secret explosion about Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

सोनं पुन्हा महागलं! ग्राहकांच्या खिशाला झळ; जाणून घ्या आजचे दर

पाण्यावरून राजकारण तापलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘कोणी माईका लाल…’

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनदर

भन्नाट फीचर्ससह महिंद्रा कंपनीची कार लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये

कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचायं ? तर Vivo कंपनीची जबरदस्त सिरीज लाँच