MD Drugs | किराणा मालाच्या दुकानातून सामान्य माणूस आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेतात. किराणा मालाच्या दुकानातून आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू विकत घेतो. मात्र आता त्याच किराणा मालाच्या दुकानामध्ये ड्रग्ज (MD Drugs) विकल्याचं आपण ऐकलं का? मात्र अशी एक घटना उल्हासनगर हिललाईन परिसरात घडली आहे. 4 कोटी 50 लाख 70 हजार किंमतीचा एमडी ड्रग्ज (MD Drugs) साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांनी राजेशकुमार प्रेमचंद तिवारीला अटक केली आहे.
कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
ही घटना उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उल्हासनगरमध्ये ग्रामीण भागात नेवाळी नाक्यावर असणारे राजेशकुमार तिवारी यांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्यामध्ये एमडी ड्रग्ज असल्याची खबर पोलिसांना लागली. कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुकानावर छापा टाकून त्यांच्यावर कोटी 50 लाख 70 हजार एमडी ड्रग्ज (MD Drugs) साठा जप्त केला.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उल्हासनगरमध्ये ग्रामीण भागात नेवाळी नाक्यावरील किराणा मालाच्या दुकानावर पोलिसांनी दुपारी छापा टाकला. दुकानाची शुक्रवारी दुपारी झडती घेण्यात आली तेव्हा दुकानदार राजेशकुमार तिवारी घाबरले. त्यावेळी त्यांच्या दुकानामध्ये 3 किलो 6 ग्रॅम एमडी ड्रग्स (MD Drugs) पावडर सापडली. त्याची किंमत ही 4 कोटी 50 लाख 70 हजार रूपये आहे.
बेकादेशीर विक्री
तिवारीला हा अंमली पदार्थांचा साठा शैलेश अहिरवारने दिला. त्याच्याकडून मिळालेल्या अंमली पदार्थांची तिवारी बेकायदेशीर विक्री करत होता. याप्रकरणी दुकानदार राजेशकुमार याला पोलिसांनी ताब्यत घेतलं असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
शैलेश अहिरवारला लवकरच पोलीस ताब्यात घेणार आहेत. गुन्हे शाखेच्या कारवाईने नशेच्या बाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच गेल्या काही महिन्यांआधी पुणे शहराच्या ड्रग्ज रॅकेटचा धक्कादायक खुलासा समोर आला होता.
गेल्या काही वर्षांआधी ललित पाटील हा पुणयातील येरवडा जेलमध्ये अटक होता. त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने ससून रूग्णालयात ललित पाटीलला उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं. तो रूग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. तो रूग्णालयातून बाहेर पडत असताना पोलिसांना तुरी देऊन पळाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता. हे प्रकरण बरंच गाजलं होतं. अशीच परिस्थिती उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहायला मिळत आहे.
News Title – MD Drugs Stock Seized From Kirana Shop In Ulhasnagar
महत्त्वाच्या बातम्या
…तर आता मला मोदींच्या काही गोष्टी पटत आहेत; राज ठाकरेंचं भुवया उंचवणार वक्तव्य
विरोधक म्हणतायेत एक एक वर्षाला पंतप्रधान करायचा; यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नागरिकांनो घराबाहेर पडू नका; आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट
आज या राशींचे भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, बक्कळ पैसा मिळणार !
“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?