नागरिकांनो घराबाहेर पडू नका; आज राज्यातील या भागात उष्णतेची लाट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather l गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अशातच हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत विजांच्या गडगडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

या भागात पावसाची दाट शक्यता :

हवामान विधाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच आज ठाणे जिल्ह्यासह मुंबईत आज तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज कोकण विभागातही उन्हाच्या झळा बसणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील तापमानात आज वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या खात्यानुसार, कोकण विभागातील तुरळक भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather l मुंबईत हवामान कसं असणार? :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा अजूनही वाढत आहे. तसेच पहाटे धुके असणार आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवणार आहे. त्यामुळे मुंबईत गार, गरम वातावरण अनुभवायला मिळणार आहे. तसेच पुढील दोन दिवसात मुंबईसह उपनगरातील तापमानात देखील वाढ होणार आहे. अशातच आज मुंबईचा पारा 25 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यातील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणेच मे महिना देखील नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे. तसेच वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

News Title – Maharashtra Weather Updates 

महत्त्वाच्या बातम्या

आज या राशींचे भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, बक्कळ पैसा मिळणार !

“शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीबाहेर काढलं…”, व्हिडीओत नेमकं काय?

सेक्स स्कँडल प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अमोल कोल्हेंचा मोठा डाव म्हणत शिवाजी आढळरावांची माघार, यापुढे कोल्हेंना उत्तर देणार नाही!

लग्नाआधी बच्चन कुटुंबीयांनी केली होती ‘ही’ मागणी, ऐश्वर्याने दिलेला नकार