बँकेचे कामे उरकून घ्या;’या’ दिवशी शहरातील बँका राहणार बंद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank Holiday | देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज रविवार असल्याने (5 मे) बँका बंद आहेत. आता दोन दिवसांनंतर म्हणजेच 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.

त्यामुळं ज्यांना बँकेचे व्यवहार करायचे आहेत, त्यांनी यादी तपासूनच बाहेर पडावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 19 एप्रिलला देशात मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता. दुसरा टप्पा 26 एप्रिलला आणि आता तिसरा टप्पा हा 7 मे रोजी पार पडणार आहे.

‘या’ शहरांमध्ये बँका बंद राहणार

लोकसभा निवडणुकीमुळे आरबीआयने सुट्टीची (Bank Holiday )यादी जाहीर केली आहे. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अहमदाबाद, भोपाळ, पणजी आणि रायपूर या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

‘या’ ठिकाणी होणार तिसरा टप्प्यातील मतदान

कोकराझार, धुबरी, बारपेटा, गुवाहाटी, झांझारपूर, सुपौल, अररिया, मधेपुरा, खगरिया, सुरगुजा, रायगड, जांजगीर-चंपा, कोरबा, बिलासपूर, दुर्ग, रायपूर, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कच्छ, बनासकांठा, पाटण, महेसाणा, साबार गांधीनगर, अहमदाबाद पूर्व, अहमदाबाद पश्चिम, सुरेंद्रनगर, राजकोट, पोरबंदर, जामनगर, जुनागढ, अमरेली, भावनगर, आनंद, खेडा, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, छोटा उदयपूर, भरूच, बारडोली, सुरत, नवसारी, वलसाड, चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट , विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पल, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तरा कन्नड, दावणगेरे, शिमोगा, मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ, राजगड, रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, , माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंगले, संभल, हाथरस, आग्रा, फतेहपूर सिक्री, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदाऊन, आमला, बरेली, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, जंगीपूर, मुर्शिदाबाद, दादर , दमण आणि दीव, अनंतनाग-राजौरी या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, मे 2024 मध्ये एकूण 12 दिवसांच्या बँक (Bank Holiday ) सुट्ट्यांपैकी 4 दिवस रविवार आहेत. त्यामुळे देशात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

मे महिन्यातील एकूण सुट्ट्या

5 मे : रविवार
८ मे: रवींद्रनाथ टागोर यांची जयंती
10 मे: बसव जयंती/अक्षय तृतीया
11 मे: दुसरा शनिवार
12 मे : रविवार
16 मे: राज्य दिनाच्या सुट्टीमुळे गंगटोकमधील सर्व बँका बंद राहतील.
19 मे : रविवार
20 मे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, बेलापूर आणि मुंबईतील सर्व बँका बंद राहतील.
23 मे : बुद्ध पौर्णिमा
25 मे : चौथा शनिवार
26 मे : रविवार

News Title : Bank Holiday list in May 2024

महत्त्वाच्या बातम्या-

शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहतासारखा पुन्हा स्कॅम?; बड्या उद्योजकाचा खळबजनक दावा

“अजित पवारांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील, कारण…”

कोव्हिशिल्डमुळे हार्ट अटॅक आला?, श्रेयस तळपदे म्हणाला…

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; ‘या’ मराठी अभिनेत्याचं निधन

पहाटेच्या शपथविधीबाबत श्रीनिवास पवारांचा मोठा गौप्यस्फोट!