“अजित पवारांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील, कारण…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shrinivas Pawar | देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघाचीच अधिक चर्चा रंगली आहे. येथे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. अजित दादांच्या बंडखोरीनंतर पवार कुटुंब एकमेकांविरोधात उभं ठाकलं आहे.

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या थेट शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या आहेत. दोन्ही उमेदवारांकडून येथे जोरदार प्रचार केला जातोय. बारामतीची निवडणूक म्हणजे या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अशात अजित पवार यांचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या 7 तारखेला मतदान होणार आहे. या मतदानावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने इथे जोरात प्रचार सुरू आहे.

शनिवारी बारामतीमध्ये झालेल्या प्रचारात अजित पवार यांनी मोठं विधान केलं होतं. सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानाबाबतच त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“..तर अजित दादांनी आत्ताच मिशा काढाव्यात”

“अजित दादा शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी फक्त जे म्हटलंय ते लक्षात ठेवावं. त्यांनी जर सर्व पवारांबाबत असं काही बोललं असेल तर त्यांनी 4 जूनपूर्वीच मिशा काढायला हव्यात. रोहित हा जन्माने बारामतीकर आहे. त्याचं घर आणि शेती इथेच आहे. त्यामुळे तो इथेच राहणार आहे. राहिला विषय माझा तर मी इथेच राहतो. त्यामुळे दादा यांनी दिलेला शब्द पाळावा.”, असं श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) म्हणाले आहेत.

दरम्यान, 4 जून नंतर चित्र वेगळं दिसलं तर अजित पवार हे आपल्या मिशा काढतात काय?, हे पाहावं लागेल. राजकीय वर्तुळात सध्या श्रीनिवास पवार आणि अजित पवार यांची चर्चा रंगली आहे. निवडणुकीमुळे संपूर्ण कुटुंब चर्चेत आलंय.

News Title –  Shrinivas Pawar target ajit pawar