कंगनाची जीभ घसरली!, प्रचाराच्या गडबडीत ‘या’ बड्या भाजप नेत्यावरच केली टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आता हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे. तिला भाजपने उमेदवारी दिली आहे. सध्या ती चर्चेत आली आहे. ती मंडी मतदारसंघात प्रचारसभेमध्ये दंग झाली आहे. विरोधकांवर टीका करत आहे. मात्र आता कंगनाने (Kangana Ranaut) एक मोठी चूक केली आहे. तिला दुसऱ्या नेत्यावर टीका करायची होती. मात्र तिने भाजप नेत्यावर टीका केल्याने ती आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. (Kangana Ranaut)

कंगना राणौतला (Kangana Ranaut) मासे खाण्यावरून राष्ट्रीय जनता दलचे नेते यांचं नाव घ्यायचं  होतं. मात्र आता कंगनाने भाजपच्या नेत्याचं नाव घेतलं आहे. तेजस्वी सूर्या असं त्या भाजप नेत्याचं नाव असून  कंगनाने तेजस्वी सूर्या यांच्यावर वक्तव्य केलं. तेजस्वी सूर्या आणि तेजस्वी यादव या नावात कंगनाचा गोंधळ उडाला आहे.

रॅलीमध्ये प्रचारावेळी कंगना राणौतला विरोधकांवर हल्लाबोल चढवत असताना कंगनाने चुकून आपल्याच भाजप पक्षातील खासदार तेजस्वी सूर्या यांना तिनं सुनावलं. प्रचारसभेत बोलत असतान ती म्हणाली की, “हा बिघडलेल्यांचा पक्ष आहे. त्यांनाच माहित नाही की त्यांना कुठे जायचं आहे. मग ते राहुल गांधी असो, ज्यांना चंद्रावर बटाटे उगवायचे असतील किंवा मग तेजस्वी सूर्या असो जे गुंडगिरी करतात आणि मासे खातात,” असं वक्तव्य कंगनाने  केलं आहे.

व्हिडीओ व्हायरल

कंगनाला तेजस्वी यादव असं नाव घेण्याऐवजी कंगनाने तेजस्वी सूर्या असं नाव घेतलं. ते भाजपचे खासदार आहेत. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. कंगनाच्या वक्तव्यावर तेजस्वी यादवने कंगनाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोण आहेत या मॅडम? असं म्हणत कंगनाला टोकलंय.

गेल्या महिन्यात तेजस्वी यादव यांचा हेलिकॉप्टरमध्ये बसून मासे खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीका केली होती. मात्र त्यांनी हा व्हिडीओ नवरात्रीच्या आधीचा असल्याचं सांगितलं.

जवाहरलाल नेहरू आणि घराणेशाहीर काय म्हणाली कंगना?

जवाहरलाल नेहरू पंतप्रधान कसे झाले काय माहिती? कारण त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्याबाजूने मतदान झालं होतं. तेव्हापासून देशाला घराणेशाहीच्या किड्याने देशाला संक्रमित केलं आहे. एकीकडे आपल्याला तपस्वीचे सरकार आहे तर दुसरीकडे भोगी सराकार असल्याचं कंगना म्हणाली.

News Title – Kangana Ranaut Confuse During Campaign Speech About Same Name Mandi Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

“अजिबात एक रूपया सोडायचा नाही, पण…”; धैर्यशील मोहिते-पाटलांचं मोठं वक्तव्य

“रोहित पवारांना अटक झाली तरी मी…”; राजेंद्र पवारांच्या वक्तव्याने खळबळ

‘आढळरावांनी सरड्या पेक्षा जलद रंग बदलला’; अमोल कोल्हेंची टीका

पीएम किसानच्या यादीत तुमचं नाव आहे का?, असं करा झटपट चेक

शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहतासारखा पुन्हा स्कॅम?; बड्या उद्योजकाचा खळबजनक दावा