‘आढळरावांनी सरड्या पेक्षा जलद रंग बदलला’; अमोल कोल्हेंची टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe Vs Adhalrao Patil | शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आयात केलेले उमेदवार आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Adhalrao Patil) यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. दोघांमध्ये आव्हान प्रतिआव्हान सुरू आहे. दोघेही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील (Amol Kolhe Vs Adhalrao Patil) यांना प्रतिआव्हान दिलं होतं. त्यावर आढळरावांनी एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळालं. अमोल कोल्हे मला आव्हान प्रतिआव्हानात अडकवत असल्याचा दावा आढळराव करत आहेत. यावर आता अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा आढळरावांना धारेवर धरलं आहे.

अमोल कोल्हेंची टीका

अमोल कोल्हे हे मला आव्हान प्रतिआव्हानामध्ये अडकवून ठेवतात. यामुळे मी आता कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नाही, असं आढळराव म्हणालेत. आढळरावांनी ही भूमिका घेतल्यानंतर कोल्हेंनी त्यांना सरड्यांची उपमा दिली आहे. (Amol Kolhe Vs Adhalrao Patil)

“यापुढे मी अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देणार नाही”

यापुढे मी अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर देणार नाही. कारण अमोल कोल्हे हे मला आव्हान प्रतिआव्हानात गुंतवून ठेवण्याचा डाव करत आहेत, असं म्हणत आढळरावांनी माघार घेतली. त्यावर अमोल कोल्हे यांनी आढळराव हे एखाद्या सरड्यापेक्षा लवकर रंग बदलतात, असा टोला आढळरावांना लगावला. यावर आढळराव पाटील काय म्हणतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांना आढळराव पाटील यांनी पुरावे जमा करा, असं आव्हान दिलं होतं. ते आव्हान आता अमोल कोल्हे यांनी पूर्ण केलं. आढळराव पाटील 7 एप्रिल 2017 आणि 13 फेब्रुवारी 2019 दरम्यान लोकसभेत असताना त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे कोल्हेंना दाखवली. तेव्हा आढळरावांबाबतचे पुरावे बाहेर आलेत. यावर आता आढळराव पाटील हे राजकारणातून माघार घेणार का?, यावर प्रश्नचिन्ह आहे.

कंपनी हितासंबंधी आढळरावांनी लोकसभेत प्रश्न मांडले आहेत. त्याचा गठ्ठा घेऊनच लोकांसमोर सर्व प्रश्न वाचून दाखवणार असल्याची भूमिका अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. यामुळे आता आढळरावांचं टेन्शन वाढलं आहे. म्हणून आता आढळरावांनी मी कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

News Title – Amol kolhe Vs Adhalrao Patil Over Various Shirur Loksabha

महत्त्वाच्या बातमी

पहाटेच्या शपथविधीबाबत श्रीनिवास पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

महाराष्ट्र हादरला! किराणा मालाच्या दुकानातून होतेय ड्रग्जची विक्री

Post Office ची कमाल योजना; ‘या’ योजनेतून महिन्याला मिळेल 20 हजार रूपये

मोहित कंबोज यांच्या ट्विटने राजकारणात खळबळ!

सोनं पुन्हा महागलं! ग्राहकांच्या खिशाला झळ; जाणून घ्या आजचे दर